1 / 12सकाळी उठल्यानंतर आपल्याला कडकडून (Easy & Quick Snack Recipes For Breakfast) भूक लागलेली असते. यातच सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच घर आवरणे, सगळ्यांचे टिफिन तयार करणे, अशी धावपळ सुरु असते. यात घरच्या गृहिणीला नाश्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. 2 / 12ऑफिसला जाताना आपल्याकडे इतकी धावपळ असते की, सर्व साग्रसंगीत (Easy 10 Min Breakfast Recipes ) करायला वेळ नसतो मग अशावेळी कधीतरी केवळ ब्रेड बटर किंवा चहा, कॉफी आणि टोस्ट अशा प्रकारचा नाश्ता करून आपण घराबाहेर पडतो. यासाठीच, सकाळच्या नाश्त्याला झटपट, इन्स्टंट पण तितकेच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ कोणते करता येतील ते पाहूयात. 3 / 12सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मटर चाटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. बटाटे, मटार उकडवून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चाट मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, जीरे पावडर, धणे पावडर घालून नाश्त्यासाठी सर्व्ह करावे. 4 / 12शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणं देखील अतिशय सोपं आहे.तसेच अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही. आपण नेहमीच्या उपम्याप्रमाणेच हा शेवयांचा उपमा देखील अगदी सहज नाश्त्याला तयार करु शकतो. 5 / 12इन्स्टंट रवा डोसा अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे. रवा, तांदुळाचे पीठ एकत्रित दह्यात भिजवून मग त्यात गरजेनुसार पाणी, मीठ, कोथिंबीर, मिरची घालूंन इन्स्टंट रवा डोसा तयार करून घ्यावा. 6 / 12घरात बऱ्याचदा आदल्या दिवशीची भाजी, आमटी आणि भात उरलेला असतो मग अशावेळी तो नुसता खायला कंटाळा येतो. पण तुम्ही हे सर्व मिक्स करून कणकेच्या गोळ्यात भरुन मिक्स पराठा तयार करू शकता. यामुळे अन्न देखील वाया जात नाही आणि नाश्ताही झटपट तयार होतो. 7 / 12शिळी पोळी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. मग नुसती पोळी खाण्यापेक्षा आपण मसाला पोळी करून खाऊ शकतो. यासाठी पोळी मिक्सरला लावून हलकेच फिरवून त्याचे बारीक तुकडे करावेत ते तुकडे बटर वर परतून थोडे कुरकुरीत करुन घ्यावेत. आता या कुरकुरीत पोळीमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घालून चहा, कॉफीसोबत खावे. 8 / 12सर्वात सोपी आणि सकाळी व्यवस्थित पोट भरणारी अशी ही झटपट नाश्ता रेसिपी म्हणजे बेसन चिला. बेसन पिठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून हे पीठ भिजवून घ्यावे. तयार बॅटर तव्यावर ओतून तेल सोडून बेसन चिला खरपूस भाजून घ्यावा. बेसन चिला सॉस सोबत खायला फार छान लागतो. 9 / 12फोडणीचा ब्रेड किंवा उपमा असे दोन्ही पदार्थ आपण नाश्त्याला खाऊ शकतो. तेलात जिरे, कडीपत्ता, मोहरी, कांदा, हळद, मीठ, टोमॅटो घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. या फोडणीत ब्रेडचे लहान लहान तुकडे घालावेत. 10 / 12हा उपम्याप्रमाणेच अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे. ताकामध्ये लसूण पाकळ्या, मिरच्या, मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या. तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या. लगेच वरून हे तयार ताकाचे मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा. शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा.11 / 12उरलेली डाळ किंवा भाज्या भाजणीमध्ये मिक्स करुन तुम्ही सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ तयार करु शकता. हे थालीपीठ दही किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे. 12 / 12सकाळी झटपट तयार होणारा असा हा नाश्ता म्हणजे इन्स्टंट रवा उत्तप्पा. यामुळे पोटंही भरतं आणि हेल्दी नाश्ता केल्याचं समाधानही मिळतं. रवा आणि दही एकत्रित मिक्स करून त्याचे थोडे जाडसर बॅटर तयार करून घ्यावे. यात आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, गाजर, बिट किसून घालावे. तव्यावर तेल सोडून उत्तप्पा तयार करून घ्यावा.