Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कॉफी अगर अहसास है..! प्या ५ प्रकारची कॉफी, नेहमीची कॉफीही सांगेल बरंच काही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 18:05 IST

1 / 6
कॉफी म्हणजे फक्त गोड आणि भरपूर दूध घातलेली असे वाटत असेल तर तसे नसून कॉफी प्रेमी विविध प्रकारची कॉफी पितात. अगदीच कडू सगळ्यांना पचत नसली तरी काही प्रकार आहेत जे नक्कीच चविष्ट असतात.
2 / 6
दूध गरम करा, कपात कॉफी पावडर आणि साखर घ्या. वरुन गरम दूध घालून ढवळा. ना जास्त घट्ट, ना पातळ ही झाली रोजचीच साधी कॉफी.
3 / 6
गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळा. नीट ढवळून १ मिनिट ठेवा. हवी असल्यास साखर घाला, नाहीतर तशीच प्या. कडूपणा आवडणाऱ्यांसाठी ही बेसिक कॉफी. ब्लॅक कॉफी कडू असली तरी आरोग्यासाठी चांगली असते.
4 / 6
कपात कॉफी पावडर, साखर आणि थोडं गरम पाणी घ्या. चमच्याने फेटा, मिश्रण क्रीमसारखं घट्ट आणि फेसाळ होईल, मग वरुन गरम दूध ओता. वर छान फोम तयार होतो.
5 / 6
लॉकडाऊनमध्ये तुम्हीही नक्कीच करुन पाहिली असेल. कॉफी पावडर अगदी घट्ट आणि फेसाळ करायची. जास्त कष्टही लागतात. साखर घाला दूध गरम किंवा थंड जसं आवडेल तसं घ्या. कॉफी दुधावर तरंगते.
6 / 6
दुधात क्रिम घालून फेटायचे. त्यात कॉफी पावडर घाला आणि दूध घालून फेटा. फेटून मिश्रण घट्ट करा आणि गार दूध तसेच बर्फ घाला. त्यात चॉकलेट घालू शकता.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स