1 / 8लिंबू पाणी आरोग्यासाठी फार चांगले असते. रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते. कोमट पाणी घ्या किंवा साधे पाणी घ्या त्यात ताज्या लिंबाचा रस पिळा आणि साखर न घालताच ते प्या. तरच त्याचा फायदा होतो. 2 / 8लिंबू पाण्यामुळे शरीर डायड्रेटेड राहते तसेच पचन प्रक्रिया चांगली होते. त्वचेसाठी फायद्याचे ठरते आणि रोग प्रतिकारक शक्तीही वाढते. मात्र लिंबू पाण्यात काही पदार्थ मिसळल्याने त्या पाण्याचे पोषण आणखी वाढते. पाहा कोणते पदार्थ आहेत. 3 / 8लिंबू पाण्यात चमचाभर मध घालायचे. मधात अँण्टी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे त्याचा फायदा होतो. घशासाठी मध चांगले असते. पचनासाठी चांगले असते. लिंबू पाण्याची चवही छान लागते. 4 / 8सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगले असते. लिंबू पाण्यात साधे रोज्या वापरायचे आयोडीन मीठ घालण्यापेक्षा त्यात सैंधव मीठ घाला. त्याचा फायदा जास्त होतो. 5 / 8जिरे पूड लिंबू सरबतातही घालतात. जिरे पूड घातल्यावर लिंबू पाण्याची चव तर वाढतेच मात्र पचनही सुधारते. गॅस तसेच अपचन होत नाही. पचनक्रिया सुरळीत व्हावी यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरते. 6 / 8आले लिंबाचा रस हा पित्तशामक असतो. तसेच पाळीच्या दिवसात महिलांना आले लिंबाचा रस प्यावा. पोटाला आराम मिळतो. गॅसे होत नाही आणि पोट साफ होते. मळमळ थांबते. 7 / 8लिंबू पाण्यात पुदिन्याची पाने घालायची. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उपयोगी ठरेल. उष्णतेचा त्रास कमी होतो. थंडावा मिळतो. पचनासाठी फायद्याचे ठरते. 8 / 8उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याऐवजी असे विविध पदार्थ घातलेले लिंबू पाणी प्या. सरबतात साखर घातल्यावर त्याचा आरोग्याला फारसा फायदा होत नाही. शिवाय वजनही वाढते.