1 / 9माव्याचे विविध पदार्थ करता येतात. दिवाळीत माव्याचे झटपट करता येणारे हे ८ पदार्थ पाहा. करायला सोपे असतात तसेच सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. लहान ते मोठे सारेच मनापासून खातील. 2 / 9मावा बर्फी करायला अगदी सोपी. विकत फार महाग मिळणारा हा पदार्थ घरीच करा. साखर, दूध, वेलची पूड, वेलदोडे असे पदार्थ घालून मस्त मऊसर बर्फी करता येते. 3 / 9गुलाबजाम हा फार लोकप्रिय असा गोडाचा पदार्थ आहे. हे गुलाबजाम छान मऊ आणि जिभेवर विरघळणारे व्हावेत यासाठी छान ताजा मावा घ्यावा. 4 / 9मावा केक भारतात प्रसिद्ध आहे. बेकारीमध्येही आरामात उपलब्ध होतो. तसेच घरीही करता येतो. नक्की करुन पाहा.5 / 9माव्याचा लाडू करतात. दिवाळीमध्ये फराळासाठी विविध प्रकारचे लाडू केले जातात. यंदा असा माव्याचा लाडू करुन पाहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. 6 / 9कलाकंद हा पदार्थ मिठाईच्या दुकानात असतोच. कारण हा फार मागणी असलेला पदार्थ आहे. तसेच कलाकंद घरी करणेही सोपे आहे. 7 / 9माव्याचे गोड शंकरपाळे करता येतात. फराळासाठी खास असा हा पदार्थ नक्की करा. त्यात दूध, साखर घालून त्याची चव वाढवता येते. 8 / 9मावा पेढा म्हणजे मऊ, गोड आणि पारंपरिक असा पदार्थ. करायला सोपा आणि मुळात सगळ्यांच्या आवडीचा असतो. 9 / 9मावा कचोरी केली जाते. ही कुरकुरीत कचोरी साखरेच्या पाकात बुडवली जाते. त्यात भरपूर सुकामेवा घालायचा, त्यात गुलाबाच्या पाकळ्याही घालू शकतात.