पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

Published:November 13, 2023 08:46 AM2023-11-13T08:46:13+5:302023-11-13T08:50:02+5:30

Diwali Celebration get to gather meal menu options for guests

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

दिवाळीच्या निमित्ताने आपण नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्याचे बेत करतो. अशावेळी काय मेन्यू करायचा असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज त्यासाठीच काही सोपे पर्याय पाहणार आहोत (Diwali Celebration get to gather meal menu options for guests).

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

दिवाळीचा फराळ आणि एकमेकांकडे गेल्यावर सतत गोड खाणे होते अशावेळी झणझणीत मिसळ सगळ्यांनाच आवडते. यातील शेव, चिवडा दिवाळीमुळे घरात तयार असल्याने मिसळीचा बेत करणेही सोपे होते.

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

संध्याकाळचा बेत असेल तर रगडा पॅटीस, भेळ असे चाटचे पर्याय आणि एखादा भाताचा प्रकार असा मेन्यूही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा होऊ शकतो.

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

छोले पुरी किंवा छोले बटुरे हा नेहमीच्या जेवणापेक्षा वेगळा आणि तरीही चविष्ट असा प्रकार करायला सोपा आणि सगळ्यांना आवडणारा असल्याने तो करण्याचा आपण नक्कीच विचार करु शकतो. यासोबत सॅलेड आणि जीरा राईस किंवा दही भात चालू शकतो.

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

पाहुणे रात्री येणार असतील तर त्यावेळी जास्त खाल्ले जात नाही. अशावेळी पूर्ण जेवण करण्यापेक्षा वन डीश मील केले तरी चालते. मसालेभात किंवा पुलाव, सूप आणि सोबत तळण किंवा सॅलेड असा बेतही चांगला पर्याय होऊ शकतो.

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

साऊथ इंडीयन पदार्थ पोटभरीचे, सगळ्यांना आवडणारे आणि झटपट होणारे असल्याने इडली, डोसा, उतप्पा आणि सांबार, चटणी असा गरमागरम बेत थंडीच्या दिवसांत चांगला वाटतो.

पाडवा, भाऊबीजेला करता येतील ७ सोपे-झक्कास मेन्यू, पाहुणे जेवतील पोटभर-होतील खूश

पराठा, सूप आणि दही किंवा चटणी असा बेतही पौष्टीक, पोटभरीचा आणि थोडा वेगळा होईल.