Join us

Diwali 2025 : चकली नरम पडते-तेलकट होते? ७ टिप्स, कुरकुरीत-काटेरी, कमी तेलकट होईल चकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:43 IST

1 / 9
दिवाळीच्या (Diwali 2025) फराळात चकली (Bhajni Chakali) हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो (Diwali Faral Making Tips). पण चकली करताना तुटते, खूपच तेलकट होते किंवा खमंगपणा येत नाही असे अनुभव बऱ्याच जणांना येतात. म्हणून लोक चकली घरी करणं टाळतात. (How To Make Crispy Chakali)
2 / 9
कमी तेलकट, कुरकुरीत चकली करण्यासाठी काय करायचं. याच्या सोप्या कुकींग ट्रिक्स पाहूया. या ट्रिक्स फॉलो केल्यानं तुम्ही घरी केलेली चकली एकदम परफेक्ट बनेल. (Chakali Making Tips)
3 / 9
चकलीची भाजणी करताना डाळी, पोहे, जिंर यांचं प्रमाण योग्य असायला हवं. साधारण ३ वाट्या तांदूळ, हरभरा डाळ १ वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी असं प्रमाण ठेवल्यास चकली कुरकुरीत होते.
4 / 9
भाजणीतील प्रत्येक घटक मंद किंवा मध्यम आचेववर व्यवस्थित भाजून घ्या. भाजणी कच्ची राहिली तर चकली तळताना विरघळते किंवा तुटते. भाजणी दळताना ती जाडसर न ठेवता बारीक पिठासारखी दळावी.
5 / 9
चकलीसाठी पीठ मळताना कडकडीत गरम पाणी वापरा. गरम पाण्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि चकली साच्याचून व्यवस्थित पडते.
6 / 9
चकली कुरकुरीत होण्यासाठी मोहन योग्य प्रमाणात असावे. १ वाटी भाजणीच्या पिठासाठी १ ते २ चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन पुरेसं आहे.
7 / 9
मळलेल्या पिठाचा जेवढा गोळा तुम्ही साच्यात घालणार आहात तेव्हढाच गोळा वापरा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवा. पीठ उघडं राहिलं तर कोरडं पडत आणि साच्यातून काढताना तुटतं.
8 / 9
चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं. जर तेल खूपच थंड असेल तर चकली तेल पिते तेल कडकडीत गरम असेल तर चकली पटकन लाल होते आणि आतून कच्ची राहते.
9 / 9
चकली तळताना तेलातील बुडबुडे कमी झाले आणि चकलीचा रंग सोनेरी झाला की चकली तळून झाली असं समजावे. चकली तळून झाल्यावर लगेच डब्यात भरू नका. पूर्णपणे गार झाल्यानंतर मगच डब्यात भरा.
टॅग्स : दिवाळी २०२५कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न