1 / 7जिवतीची पुजा तसेच दीप अमावस्या अशा काही सणांना खाण्याचे दिपे केले जातात. एखाद्या खास प्रसंगी या दिव्यांचा ओवाळणीसाठीही उपयोग केला जातो. साठी, सत्तरी असे दिवस साजरे करतानाही खाण्याचे दिवे केले जातात. 2 / 7वेगवेगळ्या पीठांचे आणि पद्धतींचे दिवे केले जातात. विविध प्रथा आणि परंपरांनुसार घरोघरी असे दिवे केले जातात. काही प्रकार आहेत जे वर्षानुवर्षे केले जात आहेत. पाहा कोणते प्रकार आहेत. तुम्हीही कधी केले आहेत का?3 / 7तांदळाच्या उकडीचे दिवे केले जातात. मोदकांसाठी जशी उकड केली जाते अगदी तशीच उकड काढायची. ती छान मळायची. जरा घट्टच ठेवायची. जास्त सैलसर करायची नाही. त्यात नारळ गूळ घातला जातो. हे दिवे वाफवून तयार केले जातात.4 / 7गव्हाच्या पीठाचे म्हणजे कणकेचे दिवे केले जातात. त्यात गूळ, दूध, तूप असे पदार्थ असतात. हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी केला जातो. गव्हाचे पीठ मळल्यावर आकार सोडत नाही. त्यामुळे दिवेही छान घट्ट होतात. 5 / 7पुराणाचे दिवे केले जातात. हे दिवे चवीला एकदम मस्त लागतात. पुरणपोळी करण्यासाठी जसे पुरण करता तसेच करायचे. फक्त डाळ जरा जास्त घ्यायची. त्यातील पाणी काढून घ्यायचे. घट्ट पीठ मळायचे. गुळही योग्य प्रमाणात घ्यायचा. 6 / 7बाजरीच्या पीठाचे छान दिवे होतात. घट्ट आणि आकाराला एकदम मस्त होतात. करायची पद्धत सारखीच फक्त पीठ बदलते. बाजरीचे ताजे पीठ घ्यायचे. चाळून घ्यायचे आणि मग त्यात गूळ विरघळवून घालायचा. वाफवून दिवे करायचे. 7 / 7ज्वारीचे ही अगदी सारखेच दिवे करता येतात. गूळ, तूप, दूध किंवा पाणी असे पदार्थ वापरुन हे दिवे करता येतात. अगदी सोपी पद्धत आहे. पौष्टिक असतात तसेच लगेच तुटत नाहीत. वाफवून करायचे. ताजे पीठ वापरायचे. म्हणजे एकदम मस्त दिवे होतात.