Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आलं-लसूण पेस्ट प्रत्येक पदार्थात घालता? व्हायरल रेसिपीतील ‘ही’ चूक करतेय तब्येतीचं नुकसान, चवही बिघडते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 19:41 IST

1 / 6
वेगवेगळ्या भाज्या किंवा अन्य कोणतेही खमंग, मसालेदार पदार्थ करायचे असतील तर आलं, लसूण पेस्ट आपण त्यामध्ये घालतोच. आलं लसूण यांच्या पेस्टमुळे त्या पदार्थाला छान चव आणि सुगंध येतो..(cooking tips about ginger and garlic paste)
2 / 6
बऱ्याच घरांमध्ये तर आलं आणि लसूण यांची एकत्र पेस्ट करून ती एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवली जाते. जेणेकरून दरवेळी ही पेस्ट तयार करण्यात वेळ जात नाही. पण अशी एकत्रितपणे आलं- लसूण पेस्ट करून ठेवणं खूप चुकीचं आहे, असं शेफ सांगत आहेत.(correct method and timing for adding ginger and garlic in cooking)
3 / 6
शेफ सांगतात की कधीही आलं- लसूण मिक्सरमधून एकत्र वाटून घेऊ नयेत आणि कढईतही एकत्र परतायला घालू नयेत. ते दोन्हीही वेगवेगळेच वाटून आणि परतून घ्यावेत.
4 / 6
कारण आल्यामध्ये जिंजरबेन हे एक एन्झाईम असतं आणि लसूणामध्ये अलिसीन असतं. जेव्हा आलं आणि लसूण एकत्र करून स्वयंपाकात घातलं जातं तेव्हा आल्यामधलं एन्झाईम ॲलिसीनला मारक ठरतं. यामुळे लसूणाचा स्वाद आणि त्याच्यातून मिळणारे आरोग्यदायी फायदे हे दोन्हीही कमी होऊन जातात.
5 / 6
त्यामुळेच प्रोफेशनल शेफ कधीही आलं, लसूण पेस्ट एकत्र वाटून किंवा परतून घेत नाहीत. त्यासाठी हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे बारीक करून घ्या. यानंतर कढईमध्ये तेल घालून ती गॅसवर गरम करायला ठेवा.
6 / 6
सगळ्यात आधी आलं परतून घ्या आणि त्यानंतर मग लसूण घाला. आल्याला तेल कमी तापलेलं लागतं तर लसूणाला तेल जास्त गरम झालेलं हवं असतं. तरच या दोन्ही पदार्थांचा स्वाद आणि त्यांच्यातले गुणधर्म खुलून येतात आणि मग भाज्यांना येते रेस्टॉरंटसारखी खमंग चव.. ट्राय करून पाहा..
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स