Join us

कपभर दह्याचे ५ मिनिटांत होणारे ५ पदार्थ पाहा- एक खास रेसिपी , चविष्ट आणि पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 13:14 IST

1 / 8
आज कोणती भाजी करायची ? किंवा आमटीला कशी फोडणी द्यायची ? तोंडी लावायला काय करायचे ? तुम्हालाही असे प्रश्न रोज पडतचं असतील. अनेक विविध रेसिपी असतात. ज्या करता येतात. मात्र बरेचदा काहीतरी झटपट करायची इच्छा असते. कामाची घाई-गडबड असते.
2 / 8
अशावेळी घरी जर कप भर दही असेल तर त्याचे विविध मस्त पदार्थ करता येतात. दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. वजन कमी करण्यासाठी डाएट करणाऱ्यांनी दही नक्की खावे. पोटाला थंडावा देणारे दह्याचे हे पदार्थ नक्की करुन पाहा.
3 / 8
दहीबुंदी म्हणा किंवा सन्नाटा रायता, हा पदार्थ फारच चविष्ट लागतो. दह्यात बुंदी भिजवायची त्याला मस्त फोडणी द्यायची. त्यात काही जण कांदा, कोथिंबीरही घालतात. अगदी सोपी रेसिपी आहे. कोशिंबीरीऐवजी एखादा दिवस नक्की करा.
4 / 8
दही भात अनेक प्रकारे करता येतो. त्यात काही जण दुधही मिक्स करतात. तसेच डाळिंबाचे दाणे घालतात. दाण्यांची फोडणी देतात. भरपूर कडीपत्ता, मिरची वापरुन फोडणी तयार करायची. दहीभात कसाही केला कोणत्याही पद्धतीने केला तरी पोटाला आराम देणाराच ठरतो.
5 / 8
मध्यंतरी भरपूर व्हायरल असणारा पदार्थ म्हणजे दही टोस्ट. भाज्या किसून दह्यात मिक्स करायच्या आणि मग ते स्टफींग ब्रेडमध्ये भरुन बिनातेलाचे परतायचे. चवीला छान लागते शिवाय फार पौष्टिक आणि कमी कॅलेरीजा पदार्थ आहे.
6 / 8
भातावर घ्यायला कधी वरण-आमटीचा कंटाळा आला तर दही तडका नक्की करा. अगदी सोपी रेसिपी आहे. एका फोडणी पात्रात छान लाल तिखट, हळद, मोहरी हिंग, जिरं, कडीपत्ता, कोथिंबीर घालून फोडणी तयार करायची आणि ती दह्यात ओतायची. छान एकजीव करायचे आणि मग भातासोबत खायचे.
7 / 8
दही भरुन कबाब किंवा रोल्स करता येतात. एक वेगळी आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे. करायला मात्र जरा जास्त वेळ लागतो. पाच मिनिटांत होत नाहीत. योग्य पद्धतीने करा म्हणजे फुटतही नाहीत आणि चविष्ट होतात.
8 / 8
चुकौनी ही एक वेगळी आणि मस्त रेसिपी आहे. ही खास नेपाळी रेसिपी उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, हिरवी मिरची, लाल तिखट, कोथिंबीर घालून केली जाते. दह्यात हे सारे पदार्थ एकजीव करायचे. हा पदार्थ कोशिंबीरीसारखाच आहे.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स