Join us

टपरीवर मिळतो तसा फक्कड चहा करण्याच्या ८ ट्रिक्स, एकदम कडक चहा करा घरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:04 IST

1 / 9
जर तुमचा चहा पांचट होत असेल आणि तुम्हाला विकत मिळतो तसा घट्ट चहा करायचा असेल तर काही टिप्स वापरून तु्म्ही घट्ट, परफेक्ट चहा करू शकता. (How To Make Tapri Style Perfect Milk Tea At Home)
2 / 9
चहा दाटसर होण्यासाठी पाणी आणि दुधाचे प्रमाण समान ठेवा शक्य झाल्यात पाण्याचे प्रमाण किंचित कमी आणि दूधाचं जास्त ठेवा.
3 / 9
चांगल्या ब्रॅण्डची चहा पावडर वापरा. चव देणारी चहा पावडर वापरल्यास चहाला टेक्स्चर चांगला येईल.
4 / 9
सर्वप्रथम चहाच्या भांड्यात पाणी घ्या आणि ते चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर लगेचचं आलं, मसाला आणि वेलची घाला मग २ ते ३ मिनिटं उकळू द्या जेणेकरून मसाल्यांचा अर्क पाण्यात उतरेल.
5 / 9
पाणी मसाले चांगले उकळल्यानंतर त्यात चहा पावडर घाला. चहा पावडर घातल्यानंतर चहाला २ ते ३ मिनिटं मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. चहाचा रंग गडद आणि चव कडक होण्यासाठी हे महत्वाचे आहे.
6 / 9
आता दूध घाला. चहा दाटसर होण्यासाठी शक्यतो न उकळलेले कच्चे किंवा मलाईदार दूध वापरा. दूध घातल्यानंतर चहाला मंद आचेवर साधारण ४ ते ५ मिनिटं उकळू द्या.
7 / 9
चहा उकळवत असताना मध्ये मध्ये चमच्यानं ढवळा, यामुळे चहा घट्ट होण्यास मदत होते.
8 / 9
साखर तुम्ही चहा पावडरसोबत किंवा अगदी शेवटीही घालू शकता. जास्त उकळल्यानं चहाची चव बिघडते. साखर विरघळेपर्यंत चहा ढवळून घ्या.
9 / 9
चहा व्यवस्थित उकळवल्यानंतर गॅस बंद करा आणि लगेचच गाळून घ्या. जास्त वेळ भांड्यात ठेवल्यास चव बिघडू शकते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स