1 / 7भेंडी भाजी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. डब्याला, जेवायला, नाश्त्याला कधीही दिली तरी मुलं आवडीने खातात. तसेच एखाद्या कार्यक्रमात जरा वेगळ्या पद्धतीने केली तर पंगतीत वाढायलाही अगदी उत्तम अशी भेंडीची भाजी करता येते. 2 / 7भेंडीची भाजी करताना भेंडी कधीही धुवायची नाही. भेंडी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची. नंतर सुक्या फडक्याने पुसली तरी चालेल नाही पुसली तरी हरकत नाही. भेंडी भरपूर पाण्यात धुतली तर ती एकदम चामट होते. चिकट होऊन लिबलिबीत लागते. 3 / 7साधी परतून केलेली भेंडीची भाजी लहान मुलांना फार आवडते. वरणभात, पोळी, भाकरी सगळ्यासोबत ही भाजी मस्तच लागते. भेंडी चिरताना पातळ गोल करायचे म्हणजे भाजी जास्त कुरकुरीत होते, तसेच तव्यावर केली तर आणखी छान लागते. 4 / 7भरली वांगी महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहेतच. त्याप्रमाणे भरली भेंडीही फार चविष्ट असा पदार्थ आहे. नारळ, गूळ, मसाले, दाण्याचे कुट आदी. पदार्थ भरुन ही भाजी करता येते. तसेच चिंच घालू शकता. गोड आवडत नसेल तर कांद्याचे वाटणही भरु शकता. 5 / 7दह्यातली किंवा ताकातली भेंडी तशी कमी लोकांना माहिती असलेली रेसिपी आहे. करायला अगदी सोपी आहे, चवीलाही मस्त असते. भेंडीची नेहमी करता तशीच भाजी करायची फक्त ताकात उकळवायची. ताक घालताना गॅस बंद करायचा म्हणजे ताक फाटत नाही. 6 / 7भेंडी फ्राय आजकाल लग्न-समारंभांमध्ये असतेच. भेंडी मधोमध चिरायची आणि तळून घ्यायची. कांदा, लसूण, टोमॅटो आदी पदार्थ वापरुन मसाला करायचा तो वाटून घ्यायचा. त्यात तळलेली भेंडी घालायची. फार मसालेदार भाजी होते. 7 / 7भेंडी बटाटा साधी, सिंपल मात्र जिभेला आवडेल अशी रेसिपी आहे. कांदा परतून घ्यायचा, बटाटे परतायचे भेंडी परतायची आणि अगदी मोजके मसाले घालून छान वाफवायची. ऑफीसला जाणाऱ्यांच्या डब्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे.