By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:35 IST
1 / 8मऊसूत आणि लुसलुशीत चपात्या होण्यासाठी गव्हाची निवड अत्यंत महत्वाची असते. उत्तम चपातीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (Best Wheat Varieties For Soft And Fluffy Chapatis)2 / 8महाराष्ट्रात चपातीसाठी लोकवन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. याचे दाणे मोठे आणि जाड असतात. ज्यामुळे चपाती मऊ होते आणि बराचवेळ टिकते. (Secret To Soft Chapatis Choose Right Wheat Type)3 / 8मध्य प्रदेशातील सीहोरी भागातील गव्हाला सरबती म्हणतात. हा गहू नैसर्गिकरित्या गोड असतो आणि त्याच्या पिठात पाण्याचे प्रमाण धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे चपात्या अत्यंत लुसलुशीत होतात.4 / 8खपली गहू हा आरोग्यासाठी उत्तम आणि पचायला हलका असला तरी याची चपाती मऊ राहण्यासाठी कणीक व्यवस्थित भिजवणं आवश्यक असते.5 / 8गहू निवडताना तो स्वच्छ, चकचकीत आणि किड न लागलेला असावा. जुना झालेला किंवा ओलावा असलेला गहू वापरल्यास चपाती कडक होऊ शकते.6 / 8अनेकजण जण लोकवन किंवा सरबती गहू सम प्रमाणात घेऊन एकत्र करून दळतात. ज्यामुळे चवीला गोड आणि पोत एकदम मऊ होतो.7 / 8गव्हाचं पीठ खूपच बारीक किंवा जाड दळू नये. मध्यम दळण असेल तर चपाती छान फुलते.8 / 8रेडीमेड गव्हाचं पीठ आणून त्याची चपाती करण्यापेक्षा गहू विकत आणून व्यवस्थित साफ करून मग पीठ दळून घ्या.