1 / 8बंगाली मिठाई म्हणजे जगभर प्रसिद्ध असलेली भारतीय खास पारंपरिक चव. अनेक प्रकारच्या मिठाई असतात. त्यापैकी ७ रेसिपी अशा आहेत ज्या घरी करणेही सहज शक्य आहे. फक्त प्रमाण आणि कृती व्यवस्थित शिकून घेणे गरजेचे. 2 / 8रसगुल्ला ही बंगालमधील सर्वात प्रसिद्ध मिठाई मानली जाते. छेनापासून बनवलेले मऊ, पांढरे गोळे साखरेच्या पाकात भिजवलेले असतात. हलके आणि रसाळ असल्यामुळे प्रत्येक घासात गोडवा आणि ताजेपणा जाणवतो.3 / 8संदेश ही छेनापासून तयार होणारी आणखी एक लोकप्रिय मिठाई. ती साखरेसोबत हलक्या आचेवर बनवली जाते आणि साधारणपणे कोरडी व मऊसर असते. वेलची किंवा केशर घालून तिचा स्वाद अधिक वाढवला जातो.4 / 8मिष्टी दोई म्हणजे बंगाली गोड दही. दूध घट्ट करून त्यात साखर किंवा गूळ मिसळून सेट केलं जातं. याचा रंग थोडा तपकिरी आणि चव खूपच समृद्ध व गोडसर असते.5 / 8चमचम ही लांबट आकाराची मिठाई असून ती ही छेनापासून तयार केली जाते. साखरेच्या पाकात भिजवून त्यावर नारळाचा कीस किंवा मावा घातला जातो., त्यामुळे तिची चव आणि दिसणं दोन्ही आकर्षक असतं.6 / 8लंगचा ही मिठाई तळून तयार केली जाते आणि नंतर साखरेच्या पाकात भिजवली जाते. दिसायला गुलाबजामसारखी असली तरी तिची चव थोडी वेगळी आणि अधिक गोड असते.7 / 8पंतुआ ही मिठाई छेना आणि खवा एकत्र करून बनवली जाते. तळल्यानंतर साखरेच्या पाकात ठेवली जाते, त्यामुळे ती आतून मऊ आणि बाहेरून हलकी घट्ट अशी लागते.8 / 8खीर कदंब ही खास प्रकारची बंगाली मिठाई आहे. आतमध्ये रसगुल्ल्यासारखा मऊ आणि रसाळ गोळा असतो, तर बाहेरुन खव्याचा थर दिलेला असतो. त्यामुळे एकाच मिठाईत दोन वेगळ्या चवींचा अनुभव मिळतो.