Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्यात आहारात हवेतच असे ५ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 10:00 IST

1 / 7
हिवाळ्याचे दिवस आरामदायक आणि सुखावह वाटत असले तरी, वातावरणातील वाढलेला (Ayurvedic winter food combination) गारठा अनेकदा आपल्या आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींना आमंत्रण देतो. या काळात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि थंडीचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराला जास्त ऊर्जा आणि पोषण यांची गरज असते. शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहाराची निवड या काळात खूप महत्त्वाची ठरते. थंडी वाढली तरी शरीर आतून ऊबदार, ऊर्जावान आणि फिट राहावं यासाठी काही खास पदार्थ रोजच्या आहारात नक्की असायला हवेत.
2 / 7
या थंडीच्या दिवसांत, अगदी फिट राहण्यासाठी आणि कडाक्याच्या थंडीतही स्वतःला ऊर्जावान ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात नेमके कोणते पदार्थ असायला हवेत आणि त्यांचे काय फायदे आहेत...
3 / 7
हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे सांध्यांमध्ये आखडलेपणा आणि वेदना वाढतात. या वेदना कमी करण्यासाठी आणि सांध्यांना आतून बळकटी देण्यासाठी जर हिवाळयात हळद, दूध आणि साजूक तुपाचा समावेश करावा. हळदीमध्ये 'कर्क्यूमिन' नावाचे सक्रिय तत्व असते, जे एक शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहे. दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा उत्कृष्ट स्रोत आहे, जे हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. हिवाळ्यात सांध्यांमधील नैसर्गिक 'ग्रीस' कमी होते, ज्यामुळे वेदना वाढतात. तूप सांध्यांना आवश्यक असलेले मॉइश्चर पुरवते आणि सांध्यांचा कडकपणा कमी करून त्यांना लवचिक बनवते.
4 / 7
थंडीच्या दिवसांत शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हाडांना बळकटी देण्यासाठी आहारात नियमितपणे तीळ, गूळ आणि खोबऱ्याचा सामावेश करावा. तिळातील कॅल्शियम हाडे मजबूत बनवते, तर मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक हाडांची घनता सुधारण्यास मदत करतात. खोबऱ्यामध्ये मॅंगनीज नावाचे खनिज असते, जे हाडांची निर्मिती आणि चयापचय क्रियेत महत्वाचे ठरते. गूळ शरीराला ऊर्जा देतो आणि रक्ताभिसरण सुधारतो. यात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. तिळाची वडी, लाडू किंवा भाजलेले तीळ, नारळाची चटणी, सुके खोबरे किंवा खोबरेल तेलाचा आहारात समावेश करावा.
5 / 7
हिवाळ्यात कफ आणि सर्दीचा त्रास वाढतो. यापासून आराम मिळवण्यासाठी 'काळी मिरी पूड' आणि 'दही' हे घटक पारंपारिक आणि उपयुक्त मानले जातात.
6 / 7
थंडीच्या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी आणि शरीराला आतून आवश्यक पोषण व उष्णता देण्यासाठी बाजरीची भाकरी, साजूक तूप आणि गूळ हे तीन पदार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाजरी हे एक उष्ण धान्य आहे, जे हिवाळ्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम असते. तूप पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढवते, ज्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. थंडीत गूळ शरीराला उबदार ठेवतो आणि रक्ताभिसरण सुधारतो. थंडीमुळे होणारा सर्दी-खोकला टाळण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आहे.
7 / 7
थंडीत त्वचा अनेकदा कोरडी आणि निस्तेज होते. त्वचेला आतून पोषण देण्यासाठी आणि शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी आवळा, बीटरुट आणि गाजर हे तीन पदार्थ खूप महत्वाचे असतात. आवळा, बीटरूट आणि गाजर यांचा एकत्र रस पिणे हा हिवाळ्यात स्किन ग्लो मिळवण्याचा आणि बॉडी डिटॉक्स करण्याचा सर्वात उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सहिवाळ्यातला आहार