Join us

साबुदाणा वडे तळताना वडा फट्कन फुटून अंगावर गरम तेल उडतं? ३ टिप्स- पोळणार-भाजणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2025 16:25 IST

1 / 7
आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणे वडे करणार असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा..
2 / 7
बऱ्याच जणींचा हा अनुभव आहे की साबुदाणे वडे करताना ते फुटतात आणि मग गरम तेल अंगावर उडून चटका बसतो. असा अनुभव आजवर कित्येक जणींनी घेतलेला आहे.
3 / 7
असं होऊ नये म्हणून वडे तळताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.. ज्यामुळे अशा त्रासदायक घटना तुम्ही टाळू शकाल.
4 / 7
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. कारण जो साबुदाणा चांगला भिजून ओलसर होत नाही, तो तळताना फुटण्याची शक्यता जास्त असते.
5 / 7
साबुदाणा आणि उकडलेला बटाटा अगदी व्यवस्थित एकत्र करून मळून घ्या. ते एकमेकांमध्ये एकजीव झाले पाहिजेत. साबुदाणा सुटा राहिला तर तो फुटण्याची शक्यात जास्त असते.
6 / 7
साबुदाणा वड्यांमध्ये हिरव्या मिरच्या घालणार असाल तर त्या मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घाला. कारण मिरचीही बऱ्याचदा तळताना फुटते आणि मग तिच्यासोबत तेलही उडून अंगावर येतं.
7 / 7
या टिप्स लक्षात ठेवल्या तर साबुदाणा वडा तळताना अजिबात फुटणार नाही. ना तुम्हाला चटका बसेल ना कढईमध्ये वडा फुटून सगळं तेल खराब होईल..
टॅग्स : आषाढी एकादशी २०२५अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स