1 / 7सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत. त्या आवळ्यांची चटपटीत चटणी करून खा. बघा जेवणात कशी रंगत येते...(amla chutney recipe)2 / 7आवळ्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी आवळे चिरून घ्या आणि त्यातल्या बिया काढून टाका. आता आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.(how to make amla chutney?)3 / 7त्यातन सुकलेल्या लाल मिरच्या आणि २ टेबलस्पून किसलेलं खोबरं घाला.4 / 7कडिपत्त्याची पानंही चटणीमध्ये घाला. जेणेकरून चटणीला एक छान स्वाद येतो.5 / 7याशिवाय लसूणाच्या ७ ते ८ पाकळ्या, बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि आल्याचा एक लहानसा तुकडाही मिक्सरमध्ये घाला.6 / 7आता चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालून हे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.7 / 7आवळ्याची चटणी एका भांड्यात काढा आणि चवीनुसार त्यात मीठ घाला. या चटणीला वरतून छान कडक फोडणी द्या. अतिशय चटपटीत चवीची आवळा चटणी तयार...