1 / 9घरात कोणताही छोटा, मोठा कार्यक्रम असतो तेव्हा दह्याचे पदार्थ केले जातात. अनेकदा घरी लावलेलं दही व्यवस्थित लागत नाही, नीट कापलं जात नाही अशी अनेकांची तक्रार असते. फक्त १५ मिनिटांत दही लावणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार मेहनत करण्याची आवश्यकता नाही. (How To Make Curd At Home)2 / 9दही लावण्याची प्रक्रिया सोपी आहे. सगळ्यात आधी १ लिटर फूल क्रिम दूध घ्या. दूध व्यवस्थित उकळवून घ्या नंतर गॅस बंद करा आणि दूध थंड होऊ द्या. दूध पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. दही लावण्यासाठी दूध थोडं कोमट करा. दूध कोमटपेक्षा जास्त गरम असावं.3 / 9दही लावण्यासाठी सर्वात महत्वाचे विरजण असते. घरात ऐनवेळी विरजण नसल्यामुळे लोक पॅकेटयुक्त दह्याचा वापर करतात.4 / 9दही मलाईदार हवं असेल तर तुम्ही १ लिटर दुधात जवळपास १ चमचा दह्याचं विरजण घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.5 / 9साध्या पद्धतीनं दही लावण्यासाठी रात्री दही लावण्याचं भांडं गरम जागेवर ठेवा. या पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळेत दही लावू शकता. दह्याचं भांडं गरम ठिकाणी ठेवल्यास कमीत कमी वेळात दही लागेल.6 / 9१ कप कोमट दुधात १ लहान चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला आणि हलवून घ्या. १५ मिनिटांत दूध फाटून दह्यासारखं घट्ट आणि आंबट बनेल. हे तुम्ही कढी, रायतासाठी लगेच वापरू शकता.7 / 9कोमट दुधात विरजण मिसळा. ते भांडं मायक्रोव्हेह सेफ बाऊलमध्ये ठेवा आणि मायक्रोव्हेव्हमध्ये ३० सेकंदांसाठी ठेवा मग बंद करा.8 / 9त्यानंतर ते भांडे मायक्रोव्हेव्हच्या आतच १५ ते २० मिनिटं बंद राहू द्या. यातील उष्णतेमुळे दही लवकर तयार होण्यास मदत होते.9 / 9कोमट दुधात विरजण मिसळून ते भांडं गरम पाण्याच्या कुकरमध्ये किंववा कॅसरॉलमध्ये ठेवा. यामुळे बाहेरील तापमान उष्ण राहून नेहमीपेक्षा खूप कमी वेळात दही जमते.