मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

Updated:February 14, 2026 08:15 IST2026-02-14T08:10:50+5:302026-02-14T08:15:02+5:30

8 nutritious moong dal recipes, easy to digest and a special treat for kids : मूगडाळीचे पदार्थ करण्याच्या सोप्या रेसिपी.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळीचे विविध पदार्थ करता येतात. आहारात ही डाळ असायलाच हवी. हे ८ पदार्थ सोपे आणि झटपट होणारे आहेत. अर्धा तास मूगडाळ भिजवा नंतर करा विविध पदार्थ.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मुगडाळीचे वरण म्हणजे सुख. मोहरी, मिरची, तूप, जिरं फोडणी द्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गरमागरम वरण भातासोबत घ्या किंवा नुसतं प्या.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळीचे कटलेट करता येतात. पौष्टिक कटलेट करण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो. तसेच मूगडाळ भिजवायची आणि वाटून घ्यायची. बाकी आवडत्या भाज्या आणि मसाले वापरा.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळ खिचडी ही हलकी, पचायला सोपी आणि शरीराला आराम देणारी डिश आहे. तांदूळ आणि मूगडाळ एकत्र शिजवल्यामुळे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला समतोल मिळतो. आजारपणात किंवा हलकं जेवायचं असेल तेव्हा हा उत्तम पर्याय ठरतो.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

धिरडं नाश्त्याला आवडीने खाल्लं जातं. मूगडाळ भिजवलेल्या मूगडाळीपासून केलेले धिरडे प्रथिनयुक्त नाश्ता. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला हा पदार्थ पोटभर आणि पौष्टिक असतो. भाज्या घातल्यास त्याची पौष्टिकता आणखी वाढते.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळ लाडू हा उर्जादायी गोड पदार्थ आहे. भाजलेल्या मूगडाळीमुळे त्याला छान सुगंध आणि पौष्टिकता मिळते. सणासुदीला किंवा मुलांच्या डब्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळीचे पौष्टिक सूप करता येते. हलके आणि पचनासाठी उपयुक्त असते. शरीराला प्रथिनांचा चांगला साठा होतो. ते पोटावर ताण आणत नाही. डायट करणाऱ्यांसाठी आणि ज्यांना हलकं खायचं आहे त्यांच्यासाठी योग्य.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

मूगडाळ पराठा हा सकस आणि पोटभरीचा नाश्ता आहे. नाश्त्यासाठी हा पदार्थ फार झटपट होणारा आणि मजेदार आहे. मुलांनाही पराठा प्रकार आवडतो. त्यामुळे नक्की करा.

मूगडाळीचे 8 पौष्टिक पदार्थ, पचायला हलके करायला सोपे आणि मुलांसाठी तर स्पेशल मेजवानी

कधी मूंगलेट ऐकले आहे का? हा पदार्थ करायला सोपा आणि अगदीच रुचकर असतो. पिझ्झा न खाता मुंगलेट खाणे पौष्टिक ठरेल.