1 / 9प्रत्येक महिन्यामध्ये काय खावे काय नाही याचा विचार करायला हवा. हंगामी पदार्थ खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. तसेच ताजी भाजी व फळे खायला मिळतात.2 / 9एप्रिल महिना म्हणजे सूर्याच्या झळांनी शरीर अगदी करपून निघणार. अशा वेळी काही फळे व भाज्याच कामी येतात. पाहा कोणते पदार्थ खाल.3 / 9एप्रिल महिन्यामध्ये ताजे आंबे मिळतात. ते खा. आंब्याचे पिक वर्षातून एकदाच येते. इतर वेळी मिळणारा आंबा नैसर्गिक नाही. त्यामुळे आंबा तर मनसोक्त खा. 4 / 9एप्रिलमध्ये बाटाटाही चांगला मिळतो. बटाट्याचे उत्पादन जास्त केले जाते. तसे बटाट्याला कायमच मागणी असते तरी चैत्रामध्ये उपवास ठेवले जातात त्यामुळे मागणी वाढते.5 / 9आता चांगल्या दर्जाची कारली बाजारात मिळतील. कारले चवीला कडू असले तरी ते अत्यंत पौष्टिक असते. 6 / 9एप्रिलमध्ये फरसबीचे पीक चांगले येते. फरसबीची भाजी नक्की विकत घ्या. फरसबी चवीलाही छान लागते. आरोग्यासाठी फार चांगली.7 / 9चांगली काकडी आता बाजारात मिळेल. उन्हाळ्यामध्ये काकडी खाणे म्हणजे सुख. शरीरासाठी पाणी फार गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण काकडीमुळे संतुलित राहते.8 / 9या महिन्यामध्ये भोपळाही चांगला मिळतो. भरीत करण्या योग्य गोड असा भोपळा नक्कीच घरी आणा. दुधी भोपळाही चांगला मिळतो.9 / 9एप्रिलमध्ये भेंडीचे उत्पादन फारच छान होते. मस्त भरलेली टवटवीत भेंडी मंडईमधून घेऊन या. भेंडीची भाजी सगळ्याच्या आवडीचीही असते.