1 / 9आपल्याकडे भारतीय आहारात ताकाला विशेष महत्वाचे(7 Reasons To Drink Buttermilk With Lunch) स्थान आहे. आरोग्याच्या दृष्टिने ताक पिणे अतिशय उपयुक्त (7 Reasons To Drink Buttermilk With Lunch Everyday) मानले जाते. विशेषतः दुपारच्या जेवणासोबत ताक पिणं ही सवय अनेक पिढ्यांपासून आपल्याकडे चालत आली आहे(Top 7 Reasons to Include Buttermilk in Your Daily Lunch).2 / 9ताक हे नैसर्गिकरित्या थंडावा देणारं, पचनाला मदत करणारं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणारं पेय आहे. त्यात कॅल्शियम, प्रोबायोटिक्स, पोटॅशियम यांसारखी पोषकद्रव्यं भरपूर प्रमाणात असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दुपारच्या जेवणासोबत ताक पिण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात...3 / 9ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनसंस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्नाचे पचन अतिशय योग्य आणि सहज पद्धतीने होते आणि गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो, यासाठी दुपारच्या जेवणासोबत आवर्जून तास पिणे फायद्याचे ठरते. 4 / 9ताक शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, विशेषतः उन्हाळ्यात ताक प्यायल्याने आपले शरीर आतून थंड राहण्यास मदत होते. 5 / 9ताकामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात. यासाठीच, नेहमी दुपारच्या जेवणासोबत ताक पिणे फायद्याचे मानले जाते. 6 / 9 दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याने अॅसिडिटी, जळजळ किंवा अपचन सारख्या पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे आराम मिळतो.7 / 9ताकामधील लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी फायदेशीर असते, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि ती निरोगी राहते. 8 / 9 ताक हे कमी फॅट असलेले आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे पेय आहे, ज्यामुळे ताक पिण्याने पचन अतिशय चांगल्या पद्धतीने होते. अन्नाचे पचन योग्य पद्धतीने झाल्यास वेटलॉस होण्यास मदत होते. 9 / 9 ताकाचा हलकासा गोडसरपणा आणि सौम्य आंबटपणा जेवणाची चव दुप्पटीने वाढवतो, ज्यामुळे जेवण अधिक रुचकर लागते.