1 / 8काही ठराविक भाज्या घरी सतत केल्या जातात त्यापैकी एक भाजी म्हणजे कोबी. कोबीची भाजी पौष्टिक असते आणि चविष्टही असते. मात्र कोबीचे इतरही काही पदार्थ करता येतात. पाहा कोणते पदार्थ आहेत. सोपे आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की करा. 2 / 8कोबी बारीक चिरुन त्याला आल्याची फोडणी द्यायची. त्यात बटाटा घालायचा. मस्त हिरवी मिरची घालायची छान सोपी आणि साधी भाजी करायची मस्त लागते. शिवाय तेल कमी वापरायचे आणि वाफवून करायची म्हणजे पौष्टिकही होते. 3 / 8कोबी पराठा हा नाश्त्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. मुलांना कोबी शक्यतो आवडत नाही. मात्र त्यांना कोबीचा छान मसालेदार पराठा दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. त्यात कांदा घाला, आलं-लसूण पेस्ट घाला मस्त होतो. 4 / 8कोबीची पचडी म्हणजेच कोशिंबीर करा. पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे. त्यात दही घाला त्याला छान फोडणी द्या. भरपूर हिरवी मिरची घाला म्हणजे छान झणझणीत चव येईल. 5 / 8जशी कांदा भजी असते आणि बटाटा भजी असते. त्याच पद्धतीची कोबी भजीही करता येते. बेसनात बारीक चिरलेला कोबी घालायचा आणि मस्त भजी तळायची. 6 / 8कोबीचे सॅलेड करता येते. डाएट करणाऱ्यांसाठी मस्त रेसिपी आहे. कोबी जरा वाफवायचा त्यात मीठ, चीज, इतरही काही भाज्या घालायच्या. ब्रोकोली घाला चव छान लागते. पनीरही मस्त लागते. 7 / 8भारतात फार लोकप्रिय असलेल्या स्ट्रीटफुड्सपैकी एक म्हणजे कोबी मंच्युरीयन. जागोजागी मिळते तसेच घरी करणेही एकदम सोपे आहे. चवीला छान लागते. मैदा कमी घातला तरी मस्तच होते. 8 / 8कोबीचे थालीपीठ पौष्टिक रेसिपी आहे. त्यासाठी ज्वारीचे पीठ वापरु शकता. तसेच बाजरीचे पीठ किंवा गव्हाचे पीठ वापरुनही करता येते. भाजणीच्या पिठात कोबी बारीक चिरुन घाला आणि मग मस्त थालीपीठ तयार करा.