By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:15 IST
1 / 7ताकाची कढी चविष्ट आणि न फाटता होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. कढीसाठी ताक खूपच जास्त आंबट किंवा खूप गळचट नसावे. ताक मध्यम आंबट असल्यास कढीची चव छान लागते. (How To Make Kadhi From Buttermilk)2 / 7ताकामध्ये बेसन घालताना ते व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिसळून घ्या.साधारणपणे १ लिटर ताकासाठी २ ते ३ मोठे चमचे इतकं बेसन पुरेसं असतं.3 / 7 कढी गॅसवर ठेवल्यापासून त्याला पहिली उकळी येईपर्यंत पळीनं सतत ढवळत राहा. यामुळे कढी फुटत नाही.4 / 7कढीला खरी चव आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीच्या ताज्या वाटणामुळे येते. हे वाटण तेलात किंवा तुपात व्यवस्थित परतवून घ्या.5 / 7चवीचा समतोल राखण्यासाठी कढीमध्ये थोडी साखर किंवा गूळ नक्की घाला. ज्यामुळे आंबटपणा संतुलित होतो.6 / 7कढीला चांगली उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी मीठ घाला. सुरूवातीला मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता असते.7 / 7कढीला नेहमी साजूक तुपाची फोडणी द्यावी. ज्यात जिरं, मोहोरी, हिंग,कढीपत्ता आणि लवंग, दालचिनी घातल्यास कढीला छान सुवास येतो.