Join us

रवा भाजा, परता, शिजवा मस्त लागतो, रव्याचे करा पौष्टिक आणि चविष्ट ७ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 15:39 IST

1 / 9
काही पदार्थ असे असतात जे घरोघरी असतातच. स्वयंपाक घरात नाहीत असे क्वचितच होत असेल. असाच एक पदार्थ म्हणजे रवा. रवा अनेक पदार्थांसाठी आपण वापरतो.
2 / 9
रव्याचे विविध पदार्थ करायला अगदी सोपे आहेत. जे तुम्हीही घरी नक्कीच करत असाल. हे पदार्थ जर तुम्ही खात नाही तर नक्की खा. चवीला मस्त आणि पचायला हलके असतात.
3 / 9
घरोघरी नाश्त्याला उपीट, उपमा, सांजा केला जातो. रवा परतून घेतला की हे पदार्थ करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी झटपट करता येतात. पौष्टिक आणि चविष्ट असतात.
4 / 9
रव्याचा ढोकळा करता येतो. ढोकळा हा गुजराथी पदार्थ असून करायला अगदी सोपा आहे. तसेच चवही एकदम मस्त असते. पचायला हलका असतो. झटपट होतो.
5 / 9
अनेक प्रकारचा शिरा करता येतो. मात्र कीतीही काही केले तरी शेवटी राजा म्हणजे रव्याचा शिराच. प्रसादाला केळी घालून केलेला किंवा नाश्त्याला तुपावर परतून केलेला शिरा म्हणजे सुख!
6 / 9
रव्याचे लाडू घरोघरी डबे भरुन ठेवलेले असतात. तुप, साखर, रवा, सुकामेवा असे विविध पदार्थ घालून रव्याचे लाडू करता येतात. चवीला फार छान लागतात. टिकतातही अनेक दिवस.
7 / 9
साऊथ इंडियन पदार्थांच्या यादीत सर्वात वरती इडलीचं नाव असतं. ही इडली मुळ रव्याचीच केली जाते. आता अनेक प्रकारची इडली करतात मात्र मुख्य पदार्थ हा रवा आहे. पौष्टिक आणि पचायला हलकी अशी रवा इडली फार प्रसिद्ध आहे.
8 / 9
रवा दही किंवा पाण्यात भिजवून त्याची पुरी करता येते. रव्याची कुरकुरीत तळलेली पुरी चवली मस्त असते. तसेच बटाट्याची भाजी किंवा इतर कोणत्याही भाजीशी लावून खायला मस्त पदार्थ आहे.
9 / 9
रव्याची खीर कधी खाल्ली आहे का? ही खीर करायला अगदीच सोपी आहे. रवा दुधात शिजवून घ्यायचा. त्यात साखर घाला किंवा गुळही घालू शकता. ही गोड खीर करायला अगदी सोपी आहे.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स