Join us

डब्यासाठी खास सॅण्डविचचे ६ प्रकार झटपट-पौष्टिक आणि स्वादिष्ट , लहान मुलांसाठी तर मेजवानीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 11:15 IST

1 / 8
लहान मुलं सॅण्डविच आवडीने खातात. पौष्टिक असते तसेच चविष्टही असते. रोज पोळी, भाकरी खायला दिल्यावर मुले घरचे पदार्थ खाणेच टाळतात. त्यामुळे त्यांना काही तरी छान वेगळे खायला द्यायलाच हवे. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे सॅण्डविच.
2 / 8
सॅण्डविच करायच्या अनेक पद्धती आहेत. त्या बरेच प्रकार असतात. तुम्हाला कोणते सॅण्डविच आवडते ? पाहा पटकन करता येण्यासारख्या सोप्या रेसिपी. डब्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहेत.
3 / 8
चटणी सॅण्डविच तर घरोघरी केलेच जाते. करायला एकदम सोपे असते. तसेच त्यात भरपूर फळभाज्या असतात त्यामुळे ते पौष्टिकही असते. मुलांनाच आवडते.
4 / 8
पनीर घालून केलेले पनीर टोस्ट सॅण्डविच करायला जरी कठीण वाटले तरी अगदी सोपे आहे. विकतपेक्षा चविष्ट घरी करता येते. तव्यावर परतून केले तरी छानच लागते. आवडत्या सगळ्या भाज्या त्यात घालू शकता.
5 / 8
दही सॅण्डविच मध्यंतरी फार व्हायरल होते. ही एक वेगळी मात्र पौष्टिक अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी करु शकता. पोटभरीचे तर असतेच पण करायलाही एकदम सोपे आहे.
6 / 8
साधे चीज सॅण्डविच मधल्या सुट्टीत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ते हलके असते. करायला मोजून पाच मिनिटे लागतात. तसेच साहित्यही अगदी कमी लागते. खास म्हणजे मुले आवडीने खातात.
7 / 8
बटाट्याची भाजी भरुन केलेले सॅण्डविच फार लोकप्रिय आहे. जागोजागी मिळते. तसेच घरी करायलाही सोपे आहे. विविध भज्या आणि बटाट्याची भाजी भरुन करायचे. त्याला चटणी तसेच सॉसही लावायचा.
8 / 8
कॉर्न सॅण्डविच तुम्ही नक्कीच खाल्ले असेल. त्यात उकडलेले दाणे, चीज, बटर, भाज्या आणि मसाले घालायचे त्याची चव छान लागते. करायलाही सोपे आणि पावसाळ्यात नक्की खा.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स