1 / 8भाजी संपली असेल काय करायचे सुचत नसेल तर पटकन केली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही भाजी घरोघरी केली जाते. पण बटाट्याची भाजी करण्याच्याही विविध पद्धती आहेत. 2 / 8सगळ्या रेसिपी चवीला वेगळ्या लागतात. त्यामुळे नक्की करुन पाहा. भाकरी , पोळी , फुलका सगळ्यासोबत या रेसिपी मस्त लागतात. एकढंच नाही तर भातासोबत बटाट्याची भाजी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. पाहा विविध रेसिपी. 3 / 8बटाट्याची अगदी सोपी आणि लहान मुलांच्या एकदम आवडीची भाजी म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. लाल तिखट घालून तेलावर खमंग परतलेल्या काचऱ्या भारी लागतात. 4 / 8मेथी आलू ही भाजी लसणाची फोडणी देऊन करायची. फारच चविष्ट लागते. त्यात मस्त कोथिंबीरही घालायची. खमंग परतायची. बटाटा छान शिजू द्यायचा. 5 / 8कांदा बटाटा रस्सा एक लोकप्रिय भाजी आहे. करायला सोपी आहे. उपलब्ध असलेले मसाले वापरुन ही भाजी करता येते. ठराविक पदार्थ घातलाच पाहिजे असे काही बंधन नाही त्यामुळे करायला हरकत नाही. 6 / 8वाटण लावलेली बटाट्याची भाजी कधी खाल्ली आहे का? साधे कांदा-लसूण-सुके खोबरे असे वाटण जसे नेहमी तयार करता तसेच करुन त्यात बटाटा परतायचा. फार चविष्ट लागतो. नक्की करुन पाहा. 7 / 8दम आलू तर सगळ्यांना माहितीच आहेत. फार चमचमीत पदार्थ आहे. भातासोबतही खाता येते आणि पोळीसोबतही. त्यामुळे टू इन वन अशी ही भाजी आहे. 8 / 8कोथिंबीर, काजू, कांदा, लसूण, सिमला मिरची , आलं, असे काही पदार्थ वाटून घ्यायचे. फोडणी तयार करायची आणि त्यात हे वाटण घालून परतायचे त्यात बटाटे घालायचे. फार मस्त रेसिपी आहे नक्की करुन पाहा.