1 / 8डोसा हा पदार्थ जरी साऊथ इंडियन असला तरी आता तो भारताच्या कोनाकोपर्यात लोकप्रिय आहे. चव छान आणि पौष्टिक असल्यामुळे डोसा पोटभर खाताना लोकांना विचार करावा लागत नाही. 2 / 8डोसा करण्याच्या अनेक विविध रेसिपी आहेत. सगळ्याच चवीला मस्त असतात तसेच करायला सोप्या असतात. डाएट करणाऱ्यांनाही डोसा खाण्यात काहीच हरकत नाही. त्यासाठी स्पेशल डाएट डोसाही करता येतो. 3 / 8मिश्र डाळींचा डोसा करणे अगदी सोपे आहे. तसेच तेल न वापरता थोडे तूप वापरुन करा म्हणजे तो फार पौष्टिकही ठरेल. नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या डब्यासाठी द्यायलाही अगदी मस्त पदार्थ आहे. 4 / 8गुलाबी रंगाचा डोसा कधी खाल्ला का? रंग वापरायचा नाही उकडलेल्या बिटाची पेस्ट घालून डोस्याचे पीठ भिजवायचे. डोसा सुटायला काहीच त्रास नाही आणि चवीलाही मस्त लागतो. बिटाचा हलका गोडसरपणा डोसा आणखी चविष्ट करतो. 5 / 8नीर डोसा हा आणखी एक फार पौष्टिक प्रकार आहे. नेहमीपेक्षा जास्त पातळ पीठ तयार करावे लागते. अगदी पाण्यासारखे पीठ करायचे. त्याचे मऊ आणि जाळीदार डोसे होतात. तांदळाचे पीठ त्यात वापरायचे. 6 / 8अगदी मऊसर काही खायची इच्छा असेल तर स्ंपज डोसा ही रेसिपी नक्कीच आवडेल. लहान-लहान स्पंज डोसा करायला अगदी सोपा आहे. खाताना भानच राहणार नाही त्यावर तूप आणि चटणी घातली तर मग आणखी मस्त चव लागते. 7 / 8रवा डोसा करायला सोपा नाही असे अनेकांना वाटते मात्र मुळात रवा डोसा फार सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे. डोसा लावताना तव्यावर तेलात बुडवलेला कांदा फिरवायचा म्हणजे डोसा आरामात सुटतो, चिकटत नाही. नक्की करुन पाहा. 8 / 8आजकाल रागी डोसा हा पदार्थ फार ट्रेंडींग आहे. अगदी पौष्टिक असतो करायला सोपा आहे आणि रात्रभर भिजवायचे कष्ट नाहीत. त्यामुळे अनेक जण नाश्त्यासाठी हा डोसा करतात. तुम्हीही नक्की करुन पाहा.