1 / 7स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचा स्वयंपाक खूप लवकर, कमी वेळेत होऊ शकतो. (6 kitchen tips for fast cooking)2 / 7चॉपिंग बोर्डवर थोडं मीठ घाला आणि मग कांदा चिरा. कांदा चिरताना अजिबात डोळ्यांतून पाणी येणार नाही. (5 Cooking Hacks for Fast & Easy Cooking)3 / 7शेजवान राईस, फ्राईड राईस, बिर्याणी, पुलाव, मसालेभात असं काहीही करणार असाल तर भात ५ ते ६ तास आधी शिजवून ठेवा. भात खूप मोकळा होईल.4 / 7लसूण सोलण्याचं काम सोपं होण्यासाठी लसूण पाकळ्या पोळपाटावर ठेवा आणि त्यावरून अलगदपणे लाटणं फिरवा. लसणाची टरफलं निघून लसूण सोलला जाईल.5 / 7भाज्या बाजारातून आणल्यानंतर धुवूनच फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून स्वयंपाक करताना भाज्या धुण्यामध्ये, स्वच्छ करण्यामध्ये वेळ जाणार नाही.6 / 7डाळ, तांदूळ, रवा, पोहे, शेंगदाणे नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात अळ्या, किडे होणार नाहीत ना, याची काळजी घ्या. जेणेकरून ते स्वच्छ करण्यात खूप वेळ जणार नाही. 7 / 7शेंगदाणे, खोबरे, दाळवं, फुटाणे यांची पावडर करून ठेवा. पातळ भाज्यांमध्ये ही पावडर घातली की भाजी लगेच दाटून येते आणि पटकन होते.