1 / 9फायबर हा आहारातील विविध महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. फायबर शरीरासाठी फार गरजेचे असले तरी ते शरीरामार्फत तयार होत नाही. त्यासाठी विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा लागतो. 2 / 9पचन प्रक्रियेसाठी फायबर गरजेचे असते. शरीरातील फायबर कमी झाल्यावर बद्धकोष्टाता, अपचन, गॅसेस असे त्रास सुरू होतात. त्यामुळे शरीरातील फायबर कमी होणार नाही याची काळजी घ्या. 3 / 9फायबरचे प्रमाण भरपूर असणारे काही पदार्थ असतात. ते रोजच्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे. फायबरचे प्रमाण संतुलित राहावे म्हणून हे पदार्थ खा. 4 / 9हिरवे मटार फायबरने भरलेले असतात. दाणे असलेले पदार्थ खावे ज्यांना आपण शेंगा म्हणतो. त्यामध्ये फायबर असते. 5 / 9छोले फार आवडीने खाता का? छोले म्हणजे काबुली चण्याची भाजी. काबुली चण्यात फायबर भरपूर असते. त्यामुळे छोले तर खाच शिवाय काबुली चणे उकडून मीठ मसाला लाऊन खाणेही चांगलेच ठरेल.6 / 9सुकामेवा आवडत असेल तर त्यात बदाम खा. तसेच अक्रोड खा. या दोन्ही पदार्थांमध्ये फायबर असते. प्रत्येकी दोन दोन खायचे चवीलाही छान असतात. 7 / 9फळांमध्ये फायबर असते. फळे खाणे आरोग्यासाठी फार चांगले. विविध फळे खाच मात्र फायबर मिळवण्यासाठी सफरचंद तसेच केळं खाणे फार फायद्याचे आहे. 8 / 9रताळे उकडून छान लागते. आहारात रताळे असावे. रताळे फायबरने परिपूर्ण असते. तसेच गाजरामध्ये फायबर असते. सॅलेड खाणे अगदीच उत्तम. 9 / 9विविध डाळी खा. शेंगा खायला हव्या. मसूर आहारामध्ये घेत जा. तसेच सोयाबीन खाणे चांगले ठरेल. सोयाबीन वजन कमी करण्यासाठी फायद्याचे असते.