1 / 8चाट हा प्रकरात आवडत नाही आसा नेमकाच कोणी असेल. तिखट, गोड, आंबट विविध चवींचे मिश्रण म्हणजे चाटचे प्रकार. मऊ तसेच कुरकुरीत पदार्थ एकाच वेळी एकाच खाद्यपदार्थांमध्ये खायचा आनंद चाट खाताना मिळतो. 2 / 8पाणीपुरी तसेच शेवपुरी हे चाटचे प्रकार आपण आवडीने खातो. मात्र चाटमध्ये असे ही काही पदार्थ आहेत जे घरी करायला अगदीच सोपे आहेत. झटपट होतात आणि चवीला पण मस्त लागतात.3 / 8पापडी चाट हा प्रकार तसा फार लोकप्रिय आहे. कुरकुरीत पापडीवर दही, उकडलेले चणे, बटाटा विविध भाज्या चटणी घालून हा पदार्थ केला जातो. दही छान घट्ट आणि गोड असले तरच हा पदार्थ खाण्यात मज्जा आहे.4 / 8कॉर्न चाट हा पदार्थ डाएट करणार्यांसाठीही चांगला आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांचे हे चाट विविध भाज्या शेव वापरुन केले जाते. मस्त चाट मसाला वापरायचा. चीज ही घालू शकता. 5 / 8तळून काढलेल्या बटाट्याचे आलू चाट दिल्ली सारख्या शहरांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. चवीला अगदी मस्त लागते. तसेच करायला फार सोपे आहे.6 / 8चनाचुर हा प्रकार कधी खाल्ला आहे का? चण्याच्या लहान पापडीचे हे चाट फारच कमाल लागते. लिंबाचा रस बारीक चिरलेला कांदा मे महिन्यामध्ये त्यामध्ये कैरी वापरली जाते. चवीला मस्त लागते.7 / 8वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात आणि चाट खायचे मन झाल्यावर हा पदार्थ खा. स्प्राऊट चाटमध्ये अनेक कडधान्ये असतात. 8 / 8पाणीपुरीवाल्याकडे आणखी एक पदार्थ दिसतो. तो म्हणजे रगडा पॅटीस चवी फारच मस्त लागते. लोकांनाही फार आवडणारा पदार्थ आहे