अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

Updated:September 9, 2025 17:30 IST2025-09-09T16:45:29+5:302025-09-09T17:30:29+5:30

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल, वजन वाढू द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवे.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dr.gaurangi.karmarkar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते ५ पदार्थ कोणते ते पाहूया..

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

पाचव्या क्रमांकावर आहे खिचडी. तुपाची फोडणी आणि भरपूर भाज्या घातलेली खिचडी प्रोटीन्स आणि फायबर देणारी असते. पचायलाही ती खूप हलकी असते.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

चौथ्या क्रमांकावर येतो बहुतांश लोकांच्या आवडीचा इडली सांबार. सांबारमध्ये डाळी, भाज्या असतात. त्यामुळे त्यातूनही प्रोटीन्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे बेसनाचं धिरडं. बेसनाचं धिरडं नारळाच्या चटणीसोबत खाल्ल्यास त्यातून प्रोटीन्स, फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. शिवाय त्यातून कॅलरीही खूप कमी मिळतात.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

आहारतज्ज्ञांच्या मते तर तुपाची फोडणी घालून केलेली भाजी आणि पोळी हे सुद्धा अतिशय आरोग्यदायी आणि एक पूर्ण आहार मानली गेलेली आहे.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

भाज्या घालून केलेला दलिया हा देखील अतिशय पौष्टिक आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलरी हे दोन्ही कमी असून नाश्ता, लंच तसेच डिनर म्हणूनही तुम्ही दलिया खाऊ शकता.