By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:27 IST
1 / 11उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. कडक उन्हामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो जाऊन त्वचा काळवंडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा आधार घेतात. 2 / 11तुम्हाला माहिती आहे का? निसर्गाने आपल्याला अशी काही फळं दिली आहेत, जी आपली नैसर्गिक सुंदरता टिकवून ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात. अशाच काही फळांबदद्ल जाणून घेऊया...3 / 11कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पाणी असतं. व्हिटॅमिन सी उन्हामुळे आलेला काळपटपणा दूर करण्यास मदत करतं. 4 / 11जर तुम्ही टॅनिंगमुळे त्रस्त असाल, तर आहारात कलिंगडचा समावेश नक्की करा. हे केवळ त्वचेला ग्लो देत नाही, तर शरीराचं तापमान संतुलित राखण्यासही मदत करतं.5 / 11संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. संत्र्याचा गर आणि साल दोन्ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.6 / 11संत्र केवळ त्वचेला खोलवर पोषण देत नाही, तर चेहऱ्यावरील गडद डाग कमी करण्यासही मदत करतं. संत्र्याच्या सालीचा वापर फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जातो.7 / 11काकडी केवळ सॅलडचा भाग नसून ती पोट आणि त्वचा दोघांसाठी आरोग्याचा खजिना आहे. काकडी संपूर्ण शरीराला हायड्रेट ठेवते. आहारात आवर्जून काकडीचा वापर करा.8 / 11चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. अनेक स्किन ट्रीटमेंट्समध्येही काकडीचा वापर केला जातो. डोळ्यावर काकडी ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो. 9 / 11आंबा जरी उष्ण असला तरी तो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतात. 10 / 11योग्य प्रमाणात आंब्याचं सेवन केल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतं.11 / 11नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्वचा चमकदार आणि मऊ ठेवण्यास मदत करतं. उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी प्यायल्यास पोट आणि त्वचा दोन्ही चांगलं राहतं.