1 / 7घरात कुठलीच भाजी नसेल तस पटकन बटाट्याची भाजी करायचा विचार आपल्या डोक्यात येतो. बटाट्याची भाजी पटकन होते तसेच चवीला मस्त असते. लहान मुलेही आवडीने खातात. 2 / 7बटाट्याची भाजी करायच्या विविध रेसिपी आहेत. ही भाजी फक्त एकाच प्रकारे करता येते असे नाही. प्रत्येक जण आवडीनुसार ही भाजी करतो. पाहा बटाट्याची भाजी करायच्या. ५ रेसिपी. 3 / 7बटाटा उकडायचा. त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे. फोडणी तयार करायची. त्यासाठी हिरवी मिरची, आलं, कडीपत्ता, मोहरी असे पदार्थ वापरायचे. फोडणीत हळद घालायची. बटाटा घालून परतायचा. अगदी सोपी रेसिपी आहे. 4 / 7बटाट्याची चमचमीत काचऱ्या तर सगळे आवडीने खातात. फोडणीत मस्त लाल तिखट घालून बटाट्याचे पातळ काप कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. लहान मुलांना हा प्रकर फार आवडतो. तसेच अगदी काही मिनिटांत भाजी तयार होते. 5 / 7सिमला मिरची, काजू, कांदा, कोथिंबीर, लसूण परतायची. नंतर वाटून घ्यायची. त्याची पेस्ट फोडणीत घालायची आणि मग त्यात बटाट्याची तुकडे घालायचे आणि परतून घ्यायचे. ही भाजी फार रसाळ आणि चविष्ट लागते. 6 / 7दम-आलू हा पदार्थ तर सगळ्यांना माहितीच असतो. भारतात ही भाजी फार लोकप्रिय आहे. करायला अगदी सोपी आहे. छान वाटण लावल्यावर चव मस्त लागते. 7 / 7बटाट्याचे गोलाकार काप करायचे. एका पॅनमध्ये तेल तिखट हळद असे पदार्थ घ्यायचे आणि त्यावर ते काप परतायचे. छान कुरकुरीत करायचे. चवीला फार मस्त लागतात. लहान मुलांना डब्याला देण्यासाठी मस्त पदार्थ आहे.