Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पनीरमधलं प्रोटीन कमी करणाऱ्या ५ चुका, पनीरचे पदार्थ करताना तुमचंही 'हे' चुकतंय का पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 09:35 IST

1 / 7
पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे शरीराची प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी बऱ्याचदा पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात.(5 mistakes that reduces the protein content in paneer)
2 / 7
शिवाय लहान मुलांनाही पनीर खूप आवडतं. त्यामुळे त्या माध्यमातून का होईना पण त्यांच्या पोटात काहीतरी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त जावं म्हणून त्यांना पनीरचे वेगवेगळे पदार्थ करून खायला दिले जातात. पण असं करताना जर रेसिपीदरम्यान तुमच्याकडून काही चुका होत असतील तर मग मात्र पनीरमधलं प्रोटीन कमी होतं आणि त्याचा म्हणावा तसा फायदा मिळत नाही.(avoid 5 mistakes while paneer recipies)
3 / 7
सगळ्यात पहिली चूक म्हणजे पनीर तळून घेणे. पनीर खूप जास्त फ्राय केल्याने त्याच्यातले कित्येक पौष्टिक घटक कमी होत जातात.
4 / 7
पनीरला खूप जास्त शिजविण्याची गरज नसते. पण काही रेसिपींमध्ये मात्र ते गरजेपेक्षा जास्त शिजवलं जातं आणि मग त्यामुळे त्याच्यातली प्रोटीनची पातळी कमी होऊन जाते.
5 / 7
पनीरला इतर कोणत्याही रिफाईंड कार्ब्ससोबत एकत्र करू नका. यामुळे पनीरमधलं प्रोटीन कमी होणार नाही, पण त्याचा हवा तसा लाभही तुमच्या शरीराला मिळणार नाही.
6 / 7
काही जण पनीरच्या रेसिपी करण्यापुर्वी ते पाण्यात घालून बराच वेळ उकळून घेतात आणि नंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकतात. यामुळेही पनीरमधले प्रोटीन्स कमी होत जातात.
7 / 7
पनीर योग्य पद्धतीने साठवून ठेवलं नाही तरी त्याच्यातले बरेच पौष्टिक घटक कमी होत जातात. फ्रेश पनीर नेहमी पाण्यात घालून फ्रिजमध्ये ठेवावं आणि जास्तीतजास्त २ दिवसांत ते संपवावं.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स