Join us
Daily Top 2 Weekly Top 5

झणझणीत-चमचमीत भरली वांगी करण्याच्या ३ रेसिपी, पारंपरिक वांग्याचा रस्सा खा-थंडीची खास मेजवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 14:43 IST

1 / 6
भरली वांगी हा पदार्थ महाराष्ट्रात घरोघरी केला जातो. चवीला एकदम चमचमीत - झणझणीत असलेले हे वांगे भाकरी, पोळी, भातासोबत मस्त लागते. भरली वांगी करायच्या विविध पद्धती आहेत. भाजी एकच असली तरी चव वेगळी लागते.
2 / 6
भरली वांगी करताना काही टिप्स लक्षात ठेवा. तसेच या तीन रेसिपी करुन पाहा. तुम्हाला या तिन्ही रेसिपी नक्की आवडतील. चवीला वेगळ्या आणि चमचमीत असतात.
3 / 6
भरली वांगी म्हणजे फक्त तिखट आणि झणझणीत असे नसते. त्यात गोड, आंबट, तिखट या चवींचाही समावेश असतो. वांगी ताजी आणि चांगली वापरा. तसेच मध्यम आकाराची वापरा. म्हणजे भाजी एकदम मस्त होते.
4 / 6
पारंपरिक कोरडी / सुकी भरली वांगी करताना त्यात रस्सा नसतो. भाजी सुकी असते. कांदा, लसूण, खोबरं आणि शेंगदाणे एकत्र करुन तिखट, धणे-जिरे पूड, मीठ इतर मसाले घालून मसाला तयार करतात. परतून घेतात. चवीला मस्त लागतात.
5 / 6
झणझणीत रस्सा भरली वांगी करण्यासाठी आकाराला लहान असलेली वांगी वापरा. कांदा, टोमॅटो, खोबरं, शेंगदाणे, तिखट, लाल मिरची, लसूण, आलं, हिरवी मिरची, चिंच, लाल तिखट, इत्यादी मसाले वाटून ते सारण वांग्यात भरायचे. त्याच सारणाची फोडणीही करायची. त्यात वांगी परतून थोडे पाणी घालायचे.
6 / 6
तिखट - गोड भरली वांगी करण्याची पद्धत घरोघरी वेगळी असते. चवीला ती एकदम मस्त लागतात. त्यात ओला नारळ, चिंच, गूळ, दाण्याचे कुट आदी इतरही पदार्थ घातले जातात. करायला ही भाजी एकदम सोपीच असते. तसेच सुके खोबरे , शेंगदाणे याचा रस्सा तयार करुन त्यात वांगी परतायची. मध्यम आकाराची वांगी वापरायची.
टॅग्स : अन्नहिवाळ्यातला आहारपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स