Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोसा नीट जमत नाही-तुटतो-चिकटतो? डाळ-तांदूळ वाटताना लक्षात ठेवा खास ट्रिक, खा क्रिस्पी-गोल्डन डोसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:23 IST

1 / 10
डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोश्याचे बॅटर अगदी परफेक्ट होणं आवश्यक आहे. (How To Make Dosa Crispy). काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुमचं काम सोपं करतील. (10 Pro Tips to Make a Perfect Dosa)
2 / 10
डोसा कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ यांचे प्रमाण ३ किंवा ४ भाग तांदूळ घेतल्यास १ भाग उडीद डाळ इतके असावे. (Perfect Dosa Making Secret)
3 / 10
इडली तांदूळ आणि साधा जाड तांदूळ यांचे मिश्रण वापरल्यास कुरकुरीतपणा चांगला येतो.
4 / 10
तांदूळ आणि डाळीसोबत १ चमचा मेथी दाणे भिजत घाला. यामुळे फर्मेंटेशन चांगले होते आणि डोश्याला चांगला रंग येतो.
5 / 10
तांदूळ आणि डाळ कमीत कमी ४ ते ६ तास वेगवेगळे भिजत ठेवा. ८ तास भिजवल्यास उत्तम ठरेल.
6 / 10
दळताना अगदी थंडगार पाणी वापरा. यामुळे दळताना उष्णता निर्माण होत नाही आणि बॅटर हलके राहते.
7 / 10
उडीद डाळ अगदी गुळगुळीत आणि हलकी होईपर्यंत दळावी. तांदूळ थोड्या जाडसर ठेवावा. यामुळे डोसा कुरकुरीत होतो.
8 / 10
आधी डाळ आणि मेथी दाणे दळून घ्यावेत नंतर तांदूळ दळावा. बॅटरची जाडी इडलीच्या बॅटरपेक्षा थोडी पातळ पण डोश्यासाठी योग्य असावी. जास्त घट्ट किंवा पातळ असू नये.
9 / 10
दळलेले बॅटर एका मोठ्या भांड्यात ठेवा. ते ८ ते १० तास उबदार जागी झाकून ठेवा. आंबवल्यावर बॅटर दोनपट जास्त फुगलं पाहिजे.
10 / 10
मीठ साधारणपणे फर्मेंटेशननंतर घालावे. ज्यामुळे प्रक्रिया व्यवस्थित होते.बॅटर हलक्या हातानं आणि एकाच दिशेनं मिक्स करा जास्त ढवळू नका. डोसा करण्यापूर्वी बॅटर १ तास फ्रिजमध्ये ठेवल्यास ते अधिक कुरकुरीत होते.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न