Join us

१० पदार्थ खा, किडनी कायम राहील ठणठणीत! घरातले साधेसोपे खाणे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 18:57 IST

1 / 11
आजकाल किडणीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किडणी काम करायची बंद होते याला अनेक कारण आहेत. आपण इतर अवयवांची काळजी तर घेतो. पण किडणीची काळजी घेत नाही. काही रोजच्या वापरातील पदार्थ आहेत ज्यांचे सेवन करणे किडणीसाठी फार फायद्याचे ठरते. या पदार्थांबद्दल आपल्याला माहितीच नसते.
2 / 11
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचा पदार्थ असतो. तो किडणीसाठी फार चांगला आहे. किडणीच्या आजारांना दूर ठेवण्यात मदत करतो.
3 / 11
विविध प्रकारच्या बेरीज किडणीसाठी उपयुक्त असतात. त्यातील अँटिऑक्सिडंट किडणीची काळजी घेतात.
4 / 11
रताळ्यामध्ये अनेक जीवनसत्वे असतात. फायबर असते. जे किडणीसाठी चांगले.
5 / 11
सुकामेवा किडणीचे आजार असणाऱ्यांनी रोज खावा. तसेच विविध सुखवलेल्या बिया खाव्यात.
6 / 11
लसुण आपण खातो. पण तिचे फायदे माहिती नसतात.लसुण किडणीसाठीच नाही तर पूर्ण शरीरासाठीच फायदेशीर असते.
7 / 11
हिरवा पाला असलेल्या सर्वच भाज्या किडणीसाठी चांगल्या. पालक, मेथी सारख्या भाज्या शरीरासाठी चांगल्या.
8 / 11
विविध डाळी आपल्या आहाराचा भाग आहेत. डाळींमध्ये फायबर व प्रोटिन भरभरून असते.
9 / 11
'सी' जीवनसत्त्व मिळवण्याचा चांगला पर्याय म्हणजे अननस .अननस खाल्याने जळजळ होत नाही.
10 / 11
यामध्ये पोटॅशियम, सोडियम कमी असते. ए, सी, बी६ जीवनसत्वे भरपूर असतात. किडणीसाठी फायदेशीर.
11 / 11
अंड्यामध्ये भरपूर प्रोटिन असते. अंड्यातील पांढरा भाग किडणीसाठी चांगला.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सफळेभाज्या