Join us   

खाण्यापिण्याच्या ५ चुकांमुळे वाढतं पोट; मेंटेन राहण्यासाठी 'या' आजपासूनच सवयी सोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 6:47 PM

1 / 7
आजकाल जगभरातील लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणाचे कारण काहींमध्ये अनुवांशिक असते. लहान लहान गोष्टी लठ्ठपणा वाढण्याचं कारण ठरू शकतात. बहुतेक लोक रोजच्या जगण्यातील चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष करतात परिणामी वजन वाढतं. (Weight Loss tips)
2 / 7
लठ्ठपणा बॉडी मास इंडेक्सच्या स्वरूपात मोजला जाऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचे वजन त्याचं वय आणि उंचीनुसार जास्त असतं तेव्हा त्याचा समावेश लठ्ठपणाच्या कॅटेगरीत होतो. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार लठ्ठपणामुळे फक्त पर्सनॅलिटीच खराब होत नाही तर फिटनेस पूर्णपणे खराब होऊ शकतो. (Reason for obesity bad eating habits lack of exercise and sleep stress know)
3 / 7
जे लोक दिवसभरात सतत काहीना काही खात असतात ते गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करतात. अशावेळी लठ्ठपणाचा धोका वाढतो. जंक फूड, जास्त ऑयली, शुगरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंही हा धोका वाढतो. टिव्ही किंवा मोबाईल समोर बसून तासनतासन खात बसल्यानंही वजन वाढतं.
4 / 7
फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी रोज व्यायाम आणि इतर फिजिकल एक्टिव्हीटीज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसभर बसून राहत असाल तर लठ्ठपणाचा धोका वाढतो. तुम्ही शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करू शकणार नाही. एक्टिव्हीटी नसलेली लाईफ स्टाईल लठ्ठपणा वाढवते.
5 / 7
वजन वाढ थांबवण्यासाठी रोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोक खूप कमी झोपतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. शरीरात असे काही हार्मोन्स रिलीज होतात ज्यामुळे लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहत नाही. कमी झोपल्यानं भूकही जास्त लागते.
6 / 7
काही लोकांमध्ये हार्मेनल प्रोब्लेम्समुळे वजन वाढतं. थायरॉईड, कशिंग सिंड्रोम आणि पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोमुळे हा त्रास वाढतो. अशा औषधांचे सेवन केल्यानंही लठ्ठपणा वाढतो.
7 / 7
जर तुम्ही जास्त ताण घेत असाल इमोशनली डिस्टर्ब असाल तर लठ्ठपणा वाढतो. जास्त राग,ताण, तणाव इतर मानसिक आरोग्याशी निगडीत फॅक्टर्स लठ्ठपणाचा धोका वाढवतात. म्हणून मानसिक आरोग्याची काळजी घ्या
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स