Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

Updated:November 13, 2025 15:54 IST2025-11-13T15:19:46+5:302025-11-13T15:54:57+5:30

Rashmika Mandanna Fitness : रश्मिका मंदानाच्या फिटनेसचं सीक्रेट जाणून घेऊया...

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सलग शूटिंग, प्रमोशन, प्रवास आणि ब्रँड इव्हेंट्समध्ये फिटनेस मेंटेन करणं सोपं नाही. पण रश्मिका मंदाना ही अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी हा बॅलेन्स उत्तम प्रकारे साधला आहे. तिच्या फिटनेसचं सीक्रेट जाणून घेऊया...

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

रश्मिकाचं वर्कआउट रूटीन फक्त एकाच व्यायामापुरतं मर्यादित नाही. ती तिच्या फिटनेस रूटीनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करून पाहते. आठवड्यातून चार दिवस ती वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

कधी किकबॉक्सिंग आणि डान्स, कधी पोहणं, फिरणं किंवा योगा. कार्डिओसाठी, ती ब्रीस्क वॉकिंग करते, तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये लँडमाइन डेडलिफ्ट्स, पुश-अप्स, चिन-अप्स आणि स्नॅच सारख्या मल्टी-जॉइंट हालचालींचा समावेश आहे.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

रश्मिका म्हणते की, उत्साहाशिवाय फिटनेस टिकू शकत नाही. कंटाळा येऊ नये म्हणून ती सतत तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये बदल करते. कधीकधी ती योगा करून तिचे शरीर स्ट्रेच करते, तर कधीकधी किकबॉक्सिंग करून ती घाम गाळते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

रश्मिका मानते की व्यायामाने फिटनेस पूर्ण होत नाही; योग्य पोषण आणि हायड्रेशन देखील आवश्यक आहे. ती तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करते, कधीकधी मेटाबॉलिझ्म वाढवसाठी एप्पल सायडर व्हिनेगर घालते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

अभिनेत्रीचा आहार बहुतेक शाकाहारी असतो. ती टोमॅटो, भोपळी मिरची, काकडी आणि बटाटे यासारख्या तिला एलर्जी असलेल्या पदार्थांपासून दूर राहते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

दुपारच्या जेवणासाठी ती हलकं आणि पौष्टिक जेवण पसंत करते, ज्यामध्ये दक्षिण भारतीय पदार्थ असतात, परंतु अनेकदा भात वगळते. रात्रीचे जेवण सहसा हलकं असते, कधीकधी सूप किंवा फळं असतात. जर तिला नाश्ता करायचा असेल तर ती जंक फूडपेक्षा सुकामेवा खाते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

शुटींग करताना एनर्जी राहावी म्हणून रश्मिका भरपूर पाणी पिते. ती दिवसभर ८ ते १० ग्लास पाणी पिते आणि नेहमी तिच्यासोबत पाण्याची बाटली ठेवते. ती म्हणते की, पुरेसे पाणी न प्यायल्याने फक्त त्वचेलाच नाही तर स्नायूंनाही थकवा येतो. शूटिंग दरम्यान ती स्वतःला नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याने हायड्रेट ठेवते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

रश्मिकाच्या फिटनेस प्रवासातील सर्वात मोठी ताकद म्हणजे कंसिस्टेन्सी आणि अडॅप्टेबिलिटी आहे. तिचं शेड्यूल कितीही बिझी असलं तरी ती नेहमीच व्यायामासाठी वेळ काढते.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

जर ती जिममध्ये जाऊ शकत नसेल तर ती तिच्या हॉटेलच्या खोलीत स्ट्रेचिंग किंवा मोबिलिटी एक्सरसाइज करते. तिच्यासाठी, फिटनेस फक्त शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

रश्मिकाचं असं मत आहे की, फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही तर स्वतःला आतून मजबूत करणं. तिच्यासाठी फॅशन नंबरमध्ये फिट होण्यापेक्षा तंदुरुस्त राहणं जास्त महत्त्वाचं आहे.