Join us   

वयाच्या ९५ व्या वर्षीही तुफान एक्टिव्ह असते Queen Elizabeth II; दीर्घायुष्यासाठी 'असा' घेते आहार शाही फॅमिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 1:25 PM

1 / 8
वर्षानुवर्ष परंपरांचे पालन करण्याशिवाय ब्रिटिश रॉयल्स आपल्या आहाराबाबतही खूप चर्चेत असतात. कारण ते नेहमीच आपल्या आहाराबाबत सजग पाहायला मिळतात. चांगल्या सवयी आणि शिष्टाचार त्यांचे सार्वजनिक वेगळेपण टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तर त्यांचा आहार निरोगी दीर्घायुष्यासाठी महत्वाचा ठरतो. जसं तुम्ही खालं तसं तुमचं मन असतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
2 / 8
ब्रिटीश राजघराण्यात असल्यामुळे त्यांच्याकडे रोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. तसंच शाही शेफ त्यांच्या सेवेत २४ तास असतात. अशा स्थितीत, जे राजघराण्यातील आहेत त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणे सोपे होते. तुम्हीसुद्धा राजघराण्यातील जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल. या लेखात, आम्ही तुम्हाला रॉयल्स कुटुंबाच्या आहाराविषयी माहिती देणार ​​आहोत.
3 / 8
दुसरी राणी एलिझाबेथ बऱ्याच काळापासून ब्रिटीश राजेशाहीचे प्रमुखपद भूषवत आहे. तथापि, ती या वयात खूप सक्रिय असते आणि तिच्या शरीरात अजूनही खूप उर्जा आहे.
4 / 8
रिपोर्ट्नुसार ही राणी नेहमी तिच्या दिवसाची सुरुवात अर्ल ग्रे चहासह काही बिस्किटांनी करते. न्याहारीसाठी, ती तिच्या आवडीचे काही पदार्थ, दही, टोस्ट आणि मुरब्बा घेते.
5 / 8
. ‘बकिंघम पॅलेस डिनर’ या पुस्तकात नमुद करण्यात आलं आहे की, राणीला नाश्त्याला मासेसुद्धा खायला आवडतात. दुपारच्या जेवणात पालेभाज्यांसह काही फळभाज्यांचा समावेश असतो.
6 / 8
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल दोघेही हेल्दी पदार्थ खाऊन आणि हेल्दी जीवनशैलीचा आनंद घेतात. 2016 च्या एका मुलाखतीत, मेघन मार्कलनं सांगितले की, आठवड्यात कधी कधी ती शाकाहारी अन्न घेते, तर आठवड्याच्या शेवटी तिचे अन्नपदार्थ बदलते. मॉर्निंग ड्रिंकच्या स्वरूपात कॉफी ऐवजी ग्रीन ज्यूसचे सेवन करते.
7 / 8
डचेस ऑफ केंब्रिज तिच्या शाही जबाबदाऱ्या असोत किंवा मातृभूमीची कर्तव्ये असोत, तरीही ती सार्वजनिक ठिकाणी सर्वोत्तम दिसण्यासाठी बरेच काही करते. तिच्या सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्याचे आणि तंदुरुस्त शरीराचे आहार हे खरे रहस्य असू शकते. रिपोर्ट्सनुसार डचेसच्या नाश्त्यात केळी, स्पिरुलिना, पालक, कोथिंबीर आणि ब्लूबेरी सारख्या पदार्थांचे मिश्रण असते. याशिवाय हेल्दी ड्रिंक्सचाही समावेश असतो. तिला डाळींचा आहारही आवडतो. केट शाकाहारी नसली तरीही दुपारच्या जेवणात मासे खायला तिला आवडत नाही. असं म्हटलं जातं की, प्रिंस विलियमसह ती अनेकदा सुशीचा आनंद घेते. अन्य रिपोर्ट्सनुसार तिच्या आवडत्या आहारात तबबौलेह, सेविच आणि गज़्पाचो, टरबूज यांचा समावेश आहे.
8 / 8
प्रिंस ऑफ वेल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवाल एक स्थिर आणि चांगले जीवन जगण्यासाठी पौष्टिक आहारावर विश्वास ठेवतात. या शाही जोडप्याला ताज्या पदार्थांचा आनंद घ्यायला आवडतो. त्यांना नाष्त्यासाठी त्यांना फ्रेश अंडी खायला आवडत असतील तर यात काही नवल नाही. सिंगापूरच्या प्रवासात, कॅमिलाने निरोगी खाण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. अहवालांनुसार, तिला गुड फॅट्स खाणे आवडते, म्हणूनच तिच्या दुपारच्या जेवणात सहसा ताजे, ऑर्गेनिक पदार्थ,मासे यांचा समावेश करते.
टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सब्यूटी टिप्सआरोग्य