Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
Updated:July 18, 2025 16:37 IST2025-07-18T15:44:46+5:302025-07-18T16:37:18+5:30
Sara Ali Khan : साराचे वजन पूर्वी ९६ किलो होतं. जे आता ५१ किलोपर्यंत आलं आहे

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या मेट्रो इन दिनों या तिच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आधी साराचं वजन फार जास्त होतं. पण तिला अभिनेत्री व्हायचं असल्याने तिने तिची जीवनशैली बदलली आणि वजन कमी केलं. साराने तिचं हे मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.
पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारखी हार्मोनल समस्या असूनही साराने तब्बल ४५ किलो वजन कमी केलं. साराचं वजन पूर्वी ९६ किलो होतं. जे आता ५१ किलोपर्यंत आलं आहे. पीसीओएसमुळे वजन कमी करणं कठीण आहे.
सारा अली खानने एका मुलाखतीत सांगितलं की, दिग्दर्शक करण जोहरने तिला तिचा पहिला चित्रपट करण्यापूर्वी वजन कमी करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला होता.
अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी होलिस्टिक अप्रोच स्वीकारला होता. यामध्ये नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.
साराने तिच्या फिटनेस रुटीनमध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा यांचा समावेश केला आहे. यासोबतच सारा डान्स देखील करायची जेणेकरून वर्कआउट मजेदार होईल.
अभिनेत्रीसाठी वजन कमी करणं हा फक्त तिच्या करिअरचा एक भाग नव्हता. सारासाठी वजन कमी करणं हे तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचं होतं.
वजन कमी केल्याने तिला PCOS मॅनेज करण्यास मदत झाली आहे. यासोबतच आत्मविश्वास वाढविण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे.
साराचा हा प्रवास वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिने हार मानली नाही तर वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
सारा अली खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. साराचे असंख्य चाहते आहेत.