किंग खान पोहोचला साठीत, पण उत्साह मात्र पंचविशीचा! शाहरुख खानला फिट ठेवतात 'या' खास गोष्टी
Updated:August 14, 2025 16:52 IST2025-08-14T15:55:37+5:302025-08-14T16:52:42+5:30

शाहरुख खान हे एक नावच पुरेसं आहे त्याचं वर्णन करायला. बॉलीवूडचा किंग खान म्हणून तो ओळखला जातो. ऑनस्क्रिन रोमान्स कसा करावा, हे कोणत्याही कलाकाराने त्याच्याकडूनच शिकावं..(fitness secret of Shah Rukh khan)
आज त्याची लेकही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवू पाहाते आहे, तरीही शाहरुख भोवती असणारं वलय काही कमी झालेलं नाही. तो आता लवकरच वयाची साठी गाठणार आहे. पण तरीही त्याचा फिटनेस, कामाचा दांडगा उत्साह आणि कितीही वेळ काम करण्याची त्याची वृत्ती या गोष्टी आजही टिकून आहेत.(diet routine and workout routine of Shah Rukh khan)
त्याला हे सगळं कसं जमतं, स्वत:ला एवढं फिट ठेवण्यासाठी तो नेमकं काय करतो, याविषयीची माहिती काही दिवसांपुर्वी त्यानेच expressfoodie.com यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली होती.
शाहरुख म्हणतो की कितीही बिझी असलो, रात्री उशिरापर्यंत जरी शुटींग केलं तरी नंतर पुन्हा फ्रेश होतो, जीमला जाऊन व्यायाम करतो आणि त्यानंतरच झोपतो. मग त्याला अगदी मध्यरात्री व्यायाम करावा लागला तरी चालेल, पण झोपण्यापुर्वी तो हमखास व्यायाम करतोच..
रुटीनच्या बाबतीत शाहरुख खान अतिशय पक्का आहे. जसा व्यायामावर त्याचा फोकस असतो, तसाच डाएटच्या बाबतीतही तो अगदी काटेकोर आहे. गरज पडेल तेव्हा साखर, मैद्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ, अल्कोहोल असं सगळं तो पुर्णपणे बंद करू शकतो. तेवढा त्याचा स्वत:वर नक्कीच कंट्रोल आहे.
प्रोटीन रिच डाएट घेण्यावर त्याचा भर आहे. त्याचबरोबर पोर्शन कंट्रोलही ताे पाळतो. म्हणजेच आपल्या जेवणातून कोणताही एखादा पदार्थ पुर्णपणे वर्ज्य न करता त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे. कोणत्याही पदार्थाचा अतिरेक न करणे हा त्याच्या डाएटचा एक महत्त्वाचा भाग आहे.
शिवाय घरी तयार केलेले पदार्थ खाणे, शुटिंगच्या वेळीही घरी सेटवरचे जेवण न घेता घरचा डबा खाण्यास प्राधान्य देणे या काही गोष्टी तो नियमितपणे पाळतो. त्यामुळेच तर आज एवढा फिट आहे.