तुमच्यासोबतच तुमचं अख्खं कुटूंब राहील निरोगी, सुदृढ! ८ सवयी लावून घ्या, तब्येत राहील ठणठणीत
Updated:June 19, 2025 17:40 IST2025-06-19T17:32:04+5:302025-06-19T17:40:11+5:30

सध्या वाढतं वजन, कमी वयातच हृदयविकार, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल असे आजार होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. हे सगळं टाळायचं असेल आणि स्वत:सोबतच अख्ख्या कुटूंबालाही निरोगी, सुदृढ ठेवायचं असेल तर या काही सवयी स्वत:ला लावून घ्या.
स्वत:ला आणि घरातल्या प्रत्येकाला जेवणाच्या आधी सॅलाड खाण्याची सवय लावा. तसेच जेवणात पोळी, चपातीचे प्रमाण कमी करून डाळ, भाजी यांचे प्रमाण वाढवा.
घाई गडबडीत, मोबाईल किंवा टीव्ही पाहात जेवण करणं टाळा. प्रत्येक घास शांतपणे चावून खा. जेवणावर लक्ष केंद्रित करा. यामुळे ओव्हरइटिंग टाळलं जातं.
बाजारात मिळणाऱ्या डाएट फूड, हेल्थ ज्यूस यांच्यापासून दूर राहा. पारंपरिक पद्धतीने घरी जो स्वयंपाक करतात, तोच खाण्यावर भर द्या.
बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. घरी जेवण्याचे प्रमाण वाढवा.
तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा रोस्ट, ग्रील, शिजवलेले, बेक केलेले पदार्थ खाण्यावर भर द्या.
आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. लहान मुलांनाही लहानपणापासूनच प्रोटीन्स खाण्याची सवय लावा.
दररोज एखादे फळ खायचेच हे ठरवून घ्या आणि फळांचा ज्सूस पिण्याऐवजी फळं चावून खाण्याला प्राधान्य द्या.
रोज कोणता ना कोणता व्यायाम न चुकता करा. घरातल्या लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्तींनाही त्यांना जमेल तसे व्यायाम रोज करायला लावा.