करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

Updated:January 28, 2026 18:40 IST2026-01-28T16:16:11+5:302026-01-28T18:40:40+5:30

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

काही जणांना अपचन, ॲसिडीटी असा त्रास नेहमीच होतो. खाण्याच्या वेळा चुकल्या किंवा काही वेगळे पदार्थ खाण्यात आले की लगेचच पोट गुबारतं, करपट ढेकर येतात..(how to get rid of acidity, indigestion?)

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

असा वारंवार होणारा अपचनाचा त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी वरवरचे उपाय करून उपयोग नाही (5 yogasana for reducing acidity and bloating). म्हणूनच अशी काही योगासनं पाहा जी तुमचा हा त्रास मुळातूनच कायमचा कमी करू शकतात.(5 exercises for reducing acidity and bloating)

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

पहिलं आहे अर्ध मत्स्येंद्रासन. हा व्यायाम केल्याने पोटाला मुरडा बसतो आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

दुसरं आहे सेतूबंधासन. सेतू बंधासन केल्याने पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी तर कमी होतातच. पण पाठ, कंबर यांचं दुखणंही कमी होतं.

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

त्रिकोणासन नियमितपणे केल्याने आतड्यांचा चांगला व्यायाम होतो. तसेच आतड्यांसोबतच पोटाचे इतर स्नायू आणि शरीराचे काही भाग व्यवस्थित ताणले जातात. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

पोटाचे स्नायू रिलॅक्स करण्यासाठी उत्तान श्वानासन करणे खूप फायदेशीर ठरते. ब्लोटिंग, गॅसेस, करपट ढेकर येणं अशा त्रासासाठी तर हा व्यायाम नियमितपणे करायला हवा.

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

पवनमुक्तासन हे एक अतिशय उत्तम आसन आहे. यामुळे पोटाच्या खालच्या भागावर योग्य तो दाब येतो आणि त्यामुळे गॅसेस मोकळे होण्यास मदत होते. ब्लोटिंग कमी होण्यासाठीही हे आसन फायदेशीर ठरते.