1 / 7कायम फिट आणि एनर्जेटीक राहायचं असेल, उत्साही- आनंदी आयुष्य जगायचं असेल तर काही साध्या सोप्या सवयी स्वत:ला लावून घेतल्याच पाहिजेत. कारण या सवयींमुळेच तर आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.2 / 7त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहुया.. त्यापैकी सगळ्यात पहिली सवय म्हणजे रोज १५ ते २० मिनिटे कोवळ्या उन्हात वेळ घालवा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी तर मिळतेच पण हार्मोन्स संतुलित राहण्यासही मदत होते. बऱ्याचदा काही कारण नसताना गळून गेल्यासारखं होतं. अशक्तपणा जाणवतो. कारण शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. 3 / 7कोणता ना कोणता व्यायाम रोज करा. पण १५ ते २० मिनिटे स्वत:साठी काढा आणि तुमच्या आवडीचा व्यायाम करा. यामुळे फिटनेस आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.4 / 7आहारात प्रोटीन्स योग्य प्रमाणात घ्या. नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो.. तुमच्या आहारात प्रोटीन्स असतीलच याची काळजी घ्या.5 / 7झोपेकडे दुर्लक्ष करू नका. हल्ली रात्री विनाकारण मोबाईलवर स्क्राेलिंग करत जागायची सवय अनेकींना आहे. ही सवय बंद करा. कारण झोप बिघडली तर शरीरातले हार्मोन्स बिघडणार आणि ते बिघडले की तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होणार. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष नकोच. झोपण्याची आणि झोपेतून उठण्याची वेळ पक्की ठरवून टाका आणि ती पाळा. 6 / 7स्वत:साठी वेळ काढा. कायम धावत पळत राहू नका. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही थकतं. दोन्हींवरचा ताण खूप वाढतो. तो कमी करायचा असेल तर स्वत:साठी वेळ काढा. तुमच्या आवडीची कामं करा. छंद जोपासा किंवा थाेडा आराम करा. रिलॅक्स राहा. स्वत:शी संवाद साधा. 7 / 7या काही गोष्टी जमल्या तर तब्येतीच्या कित्येक तक्रारी कमी होऊ शकतात, अशी माहिती डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.