1 / 6वजन कमी आहे किंवा जास्त आहे यापेक्षा तुम्ही किती फिट आहात, निरोगी आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तपासून पाहा आणि तुमचा फिटनेस स्वत:च तपासा...2 / 6सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अंथरुणावर पडताच रात्री झोप येणं. याचा अर्थ तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन कमी प्रमाणात आहेत. पचन व्यवस्थित होत आहे. मज्जासंस्थेचे काम उत्तम आहे. 3 / 6सकाळी उठल्यानंतर काही जणांना खूप भूक लागलेली असते. हे देखील निरोगी शरीराचं एक वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा की तुमची पचन क्रिया, चयापचय क्रिया दोन्हीही उत्तम आहेत.4 / 6काही अभ्यासांनुसार असं दिसून आलं आहे की जे लोक जलद गतीने चालतात त्यांचे हृदय मजबूत असते. या लोकांना मधुमेहही सहसा होत नाही.5 / 6शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून निघत असतील तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि सेल रिपेअरिंग सिस्टीम या दोन्हीही चांगल्या आहेत.6 / 6सकाळी झोपेतून उठल्यानंतर छान फ्रेश वाटत असेल आणि पोट व्यवस्थित साफ होत असेल तर हे देखील एक निरोगी व्यक्तीचं लक्षण आहे.