1 / 9परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा शाही लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यादरम्यान परिणीतीचा लेहेंगा, तिचे दागिने यांची भरपूर चर्चा झाली. आता चर्चा सुरू आहे ती तिच्या सुंदर मंगळसूत्राची.2 / 9मंगळसूत्र हा प्रत्येक भारतीय विवाहित स्त्री चा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग ती महिला अगदी साधी खेड्यातली असो किंवा मग एकदम सेलिब्रिटी असो... बॉलीवूड अभिनेत्रीही याबाबतीत काही वेगळ्या नाहीत. प्रत्येकीने अगदी खास स्टाईलने त्यांचं मंगळसूत्र घडवून घेतलं आहे. 3 / 9परिणीतीचं मंगळसूत्रही अगदी खास आहे. तिच्या मंगळसूत्राला हिऱ्यांचं पेंडंट असून त्याच्या दोन्ही बाजूला ५ ते ७ काळे मणी आहेत आणि त्यानंतर साखळी आहे.4 / 9कतरिना कैफ हिचं मंगळसूत्राची स्टाईलही थोडी फार तसंच आहे. फक्त तिच्या मंगळसूत्राला एका खाली एक हिऱ्यांचे गोल आकाराचे दोन पेंडंट आहेत. शिवाय बाजूलाही गोल आकाराचे हिरे जडवण्यात आले आहेत.5 / 9आलिया भटच्या मंगळसूत्राचीही खूप चर्चा झाली होती. तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये इन्फिनिटीचा आकार दिसतो. काही जणांना तो इंग्रजीतला 8 हा आकडा आडवा केल्यासारखा वाटला. कारण त्यांच्यामते तो आकडा रणबीर कपूरचा लकी नंबर आहे. 6 / 9परिणीतीची बहिण प्रियांका चोप्राचंही मंगळसूत्र कतरिना आणि परिणीतीच्या मंगळसूत्राप्रमाणेच आहे. फक्त त्या तिघींचे पेंडंट वेगवेगळे आहेत.7 / 9सोनम कपूर हिने तिचं मंंगळसूत्र घडविताना त्यात तिच्या स्वत:च्या आणि नवरा आनंद अहुजा याच्या राशींचं चिन्ह घातलं आहे. 8 / 9दीपिका पदुकाेनच्या मंगळसूत्राला काळे मणी असून हिऱ्यांचं एक छोटंसं पेंडंट आहे.9 / 9अनुष्का शर्माचं मंगळसूत्र दीपिकाच्या मंगळसूत्रासारखंच आहे. फक्त तिचं पेंडंट आकाराने मोठं आहे.