नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

Published:April 14, 2022 05:31 PM2022-04-14T17:31:15+5:302022-04-14T17:42:22+5:30

एरवी अभिनयामुळे किंवा फॅशनमुळे चर्चेत असलेली आलिया भट आता तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आहे. पाहूया तिचे विविध अंदाजातील खास फोटो...

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

आलिया भट आणि रणबीर कपूर हे दोघेही लग्नामुळे जोरदार चर्चेत आहेत. आलिया अभिनेत्री म्हणून दिसायला सुंदर आहेच पण तिच्या चेहऱ्यावरील निरागसता तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडते.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

नाजूकपणा ही तिची खासियत असून मॉडर्न लूक असो नाहीतर पारंपरिक आलिया दोन्हीमध्ये तितकीच सुंदर दिसते. फारसा मेकअप न करताही तिच्या नैसर्गिक सौंदर्याच्या जोरावर ती चाहत्यांमध्ये भाव खाऊन जाते.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

शायनी आणि सिल्की केस, हटके फॅशनचे कानातले आणि तिच्या डोळ्यातील भाव यांच्या जीवावर आलिया आपली वेगळी छाप सोडून जाते. सुरुवातीला तिच्यावर बरेच जोक करण्यात आले मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावले.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

आलियाला हसल्यावर पडणारी खळी चाहत्यांना घायाळ करणारी असून त्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलल्याचे पाहायला मिळते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहावे यासाठी तिचे चाहते तिला मनापासून शुभेच्छा देत आहेत.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला आलियाचा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामुळे आलिया चांगलीच चर्चेत आली. आतापर्यंत आलियाने अनेक गंभीर आणि ताकदवान भूमिका केल्याने बॉलिवूडमध्ये एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

आलिया आणि रणबीर काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू असून अखेर त्यांच्या नात्याला आता पती-पत्नीचे नाव दिले जाणार आहे.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

आलियाचे पारंपरिक वेशभूषेतील फोटो नेहमी व्हायरल होत असून ती आपले कपडे अतिशय उत्तमरित्या कॅरी करताना दिसते. पारंपरिक जड लेहंगा असो नाहीतर साडी किंवा मॉडर्न आऊटफीट आलिया सगळ्या प्रकारचे कपडे तितक्याच उत्तम रितीने कॅरी करते.

नवराई माझी लाडाची लाडाची गं! सादगी ते ग्लॅमर, आलियाच्या 'रूपा'ची जादू.. पाहा फोटो

आलिया तिच्या फॅशन सेन्समुळेही अनेकदा चर्चेत असते. कधी तिचे हटके मोठ्या आकारातील कानातले तर कधी तिने घातलेल्या कपड्यांची स्टाईल यावर जोरदार चर्चा रंगताना दिसतात. तिला फॉलो करणारा महिला वर्गही मोठा असल्याचे म्हटले जाते.