Wow! कार्तिकच्या नवा हॉट लूक ! 'हे' फोटो पाहून मुली झाल्या फिदा, एकसेएक बढिया अदा..
Updated:November 23, 2025 15:02 IST2025-11-23T14:58:48+5:302025-11-23T15:02:20+5:30
Wow! Kartik's new hot look! Girls were amazed after seeing 'this' photo, new photos of Kartik : कार्तिक आर्यनचे हॉट फोटो पाहिले का? नव्या रुपात सोशल मिडियावर व्हायरल.

फक्त एखादा डायलॉग किंवा व्हायरल झालेली गोष्ट एखाद्याला स्टार बनवू शकते. हे सध्या ट्रेंडींग असले तरी सोशल मिडियाची एवढी क्रेझ नसताना कार्तिक आर्यन २०११ मध्ये फार लोकप्रिय ठरला होता. सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय आत्ता ३५ वर्षाचा झाला आहे.
प्यार का पंचनामा हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. त्यातील कार्तिक आर्यनचा एक डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला तो म्हणजे 'वोह लडकी है'. मुलांना ते मनापासून पटलं पण काही मुलींनी त्यावर आक्षेप घेतला. तरीही त्या मुलींच्या मनात कार्तिकसाठी जागा तयार झाली.
बघता बघता कार्तिकचे फॅन्स वाढू लागले आणि त्याची बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख झाली. कार्तिक म्हणजे गोंडस आणि क्यूट असे सगळे म्हणत असतानाच त्याने गेल्या २ वर्षात कमालीचे बॉडी ट्रान्सपॉर्मेशन केले आहे.
कार्तिकने एकदम हॉट बॉडी आणि इंनटेंन्स लूक करण्यासाठी गेली २ वर्षे भरपूर कष्ट घेतले. चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी त्याने फिटनेसवर भरपूर लक्ष द्यायला सुरवात केली. त्याला स्वतःलाही त्याची बदललेली दिनचर्या आवडायला लागली.
बरेचदा पॉडकास्ट आणि मुलाखतीत त्याने सांगितल्या प्रमाणे त्याने काही डाएट किंवा कठीण व्यायाम केले नाहीत. त्याने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झोपेच्या वेळा पाळायला सुरवात केली. तसेच त्याने शुद्ध शाकाहारी आहार घेतला.
कार्तिकचा बदललेला अवतार मुलींना मात्र एकदमच भावत आहे. तो आधी चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय होता पण आता एक हॅण्डसम आणि हॉट अभिनेता आणि फिटनेस पर्सन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.