1 / 6एखादा बायोपिक येणार म्हणजे त्यासाठी आधीच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे प्रमोशन केले जाते. त्यापैकी एक पद्धत म्हणजे पोस्टर रिलिझ. इतर सिनेमांपेक्षा बायोपिक असेल तर या पोस्टरर्ससाठी क्रेझ जास्त असते. 2 / 6सध्या सगळीकडे चर्चा आहे ती व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची. सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. त्याचाही पोस्टर रिलिझ झाला मात्र चर्चा झाली ती तमन्नाच्या पोस्टरची. या चित्रपटात तमन्ना भाटीया जयश्री कामुलकर यांची भूमिका निभावत आहे.3 / 6जयश्री यांची ओळख फक्त व्ही. शांताराम यांची पत्नी एवढीच नव्हती. त्या स्वतः फार लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होत्या. हिंदी, मराठी, गुजराथी अशा विविध भाषित चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. 4 / 6जयश्री दिसायला फारच सुंदर. त्यांच्या सौंदर्याचे अनेक दिवाने होते. आजही आहेतच. त्यामुळे चित्रपटात त्यांची भूमिका कोण आणि कशी निभावेल असा प्रश्न चाहत्यांना होता. मात्र तमन्नाचा पोस्टर अगदी हिट ठरला. 5 / 6गुलाबी साडीतील तमन्नाचा सुंदर असा फोटो अगदी जयश्री यांच्या पेहरावाशी मिळता - जुळता आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. हा पोस्ट काही तासांतच चांगलाच व्हायरल झाला. 6 / 6शकुंतला, दहेज, आदी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांमध्ये जयश्री यांनी प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. व्ही. शांताराम यांचा दुसरा विवाह जयश्री यांच्याशी झाला. त्यांना तीन मुलेही झाली. त्यांचे आयुष्य आता तमन्ना या भूमिकेत कसे साकारते हे पाहण्याची ओढ चाहत्यांना लागली आहे.