Join us

सारा तेंडुलकरचं फिटनेस सिक्रेट! पाहा कशी करते दिवसाची सुरुवात, PCOS असूनही राहते स्लिम फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:13 IST

1 / 6
Sara Tendulkar Fitness Secrets : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आपल्या क्लासी लूकसाठी, फिटनेससाठी आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिला असलेल्या पीसीओएस आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी मोकळेपणाने बोलते. सारा आज अनेक तरूणींसाठी एक फिटने आयकॉन बनली आहे. अनेकजण तरूणी तिला फॉलो करून तिच्यासारखं दिसता यावं याचा प्रयत्न करतात. अशात आज आम्ही तुम्हाला सारा स्वत:ला कशी फिट ठेवते आणि तिच्या डाएटमध्ये काय असतं हे सांगणार आहोत.
2 / 6
सारानं सांगितलं की, टीनएजमध्ये तिला पीसीओएसची समस्या होती. ज्यामुळे तिचं वजन खूप वाढलं होतं. त्यामुळे तिला तिच्या डाएटची खूप जास्त काळजी घ्यावी लागत होती. आता सारा तिच्या डाएटमध्ये वेळोवेळी काहीना काही बदलही करत असते. ज्यामुळे तिला फिट आणि हेल्दी राहण्यास मदत मिळते. या सगळ्यात तिला तिची आई अंजली तेंडुलकर मदत करते.
3 / 6
व्हॉग इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सारानं सांगितलं की, इंटरमिटेंट फास्टिंग, वेट ट्रेनिंग आणि प्रोग्रेसिव ओवरलोड सारख्या गोष्टी करून स्वत:ला फिट ठेवते. तसेच ती मसल्स मजबूत करण्यासाठी प्रोटीन असलेले फूड्स खाते.
4 / 6
साराला कॉफी खूप आवडते. सारानं मुलाखतीत सांगितलं की, ती सकाळी ब्लॅक कॉफी पिते. सोबतच नट्स खाते आणि भरपूर पाणी पिते. ती कॉफी कधीही टाळत नाही. अशी तिची दिवसाची सुरूवात एकदम हेल्दी असते.
5 / 6
सकाळी उपाशीपोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते. ब्लॅक कॉफीनं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि कॅलरी बर्न होतात. त्यामुळे बरेच लोक जिमला जाण्याआधी किंवा वर्कआउट आधी ब्लॅक कॉफी पिणं पसंत करतात.
6 / 6
जर तुम्ही एखाद्या आजारासंबंधी औषधं घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लॅक कॉफी पिऊ नये. कारण उपाशीपोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी आणि पोटात गॅसची समस्या होऊ शकते.
टॅग्स : सारा तेंडुलकरफिटनेस टिप्सआरोग्य